लोहा| लोहा शहराच्या जवळ असलेल्या देऊळगाव या गावचे भूमिपुत्र शेख युसूफ यांची औरंगाबाद जिल्हा काँग्रेस शहराध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्र दिले आहे. शेख युसूफ हे अनेक वर्षा पासून औरंगाबाद शहरात वास्तव्याला आहेत.
लोहा तालुक्याचे भूमिपुत्र देऊळगाव येथील शेख युसूफ यांची औरंगाबाद जिल्हा शहर कांग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रदेश कांग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी मुबंई येथे नियुक्ती पत्र देऊन पक्ष वाढीची जबाबदारी दिली आहे. लोहा तालुक्यातील देऊळगाव येथील मूळ रहिवासी असलेले शेख युसूफ यांचे आजोळ कुरुळा आणि सासुरवाडी कंधार होय नोकरी निमित्त त्याचे कुटुंब औरंगाबाद येथे स्थायिक झाले. त्यांचे वडील शेख गुलाब हे एसटी महामंडळात औरंगाबाद येथे वाहतूक निरीक्षक म्हणून चाळीस वर्षांपूर्वी कार्यरत होते तेंव्हा पासून ते औरंगाबाद येथील एसटी कॉलनी येथेच स्थायिक झाले
शेख युसूफ हे विद्यार्थी दसेपासून एनएसयुआयच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला म एनएसयुआयचे औरंगाबाद शहर सहसचिव उपाध्यक्ष नंतर जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केले. 2005 ते 2008 या काळात ते युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस होते. हिंदू मुस्लिम एकता गणेश मंडळाचे सरचिटणीस, रायझींग स्टार एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष असे पद त्यांनी भूषविले. कोरोना काळात त्यांनी पाच लक्ष गोरगरीब जनतेला धान्याचे किट केले. गेल्या पंचवीस वर्षांपासून ते काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे काँग्रेस पक्षाने त्याची दखल घेतली प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शेख युसूफ यांना औरंगाबाद जिल्हा काँग्रेस शहराध्यक्षपदी पदाची जबाबदारी दिली. तसे पत्र मुबंई येथे देण्यात आले देऊळगाव येथील भूमिपुत्र आता औरंगाबाद काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करणार आहेत. याचा ग्रामस्थ व तालुक्याला आनंद झाला आहे अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.