नविन नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत समाजशास्त्र संकुलातून समाजकार्य विषयात एम. फील. प्रदान करण्यात आल्या बद्दल मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.
माधव डोमपले यांनी प्रा.डॉ.घनश्याम येळणे संचालक सामाजिक शास्त्र संकुल यांच्या मार्गदर्शनाखाली , "महिलांवरील कौटुंबिक हिंसाचारात समुपदेशन केंद्राची भूमिका (विशेष संदर्भ लोहा तालुका )" या विषयावर शोधप्रबंध सादर केला होता. त्यांनी केलेल्या शोधप्रबंधक नोंद घेऊन एम.फील ,पदवी काल दि. १८ जुनं रोजी प्रदान केली.
पदवी मिळाल्या बद्दल सत्कार करतांना त्यांचे मार्गदर्शक मा.डॉ. घनश्याम येळणे ,परभणी कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य तथा कॉग्रेस नेते केदार पाटील साळुंके, अकोला समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. बळवंत पाटील वर्ताळे, मा. घोरबांड , मोरे, पत्रकार रमेश ठाकूर, छायाचित्रकार सारंग नेरलक,पप्पू गायकवाड, आनंद वाघमारे व मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले.