राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक नांदेडमध्ये उभारण्याचा ठराव जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत मंजूर -NNL

स्मारक समितीच्या आंदोलनाला यश ; ॲड. कोकणे प्रशांतप्रभू यांनी मानले सर्वांचे आभार


नांदेड।
राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक नांदेड शहरात उभं कारण्याचा ठराव जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत एकमताने पास केल्याबद्दल राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे अध्यक्ष ॲड. कोकणे प्रशांतप्रभू, राज्य अध्यक्षा लता बंडगर,राज्य संघटक श्याम निलंगेकर, प्रदेश उपाध्यक्ष टोपाजी काकडे जिल्हा अध्यक्ष, यांनी सर्वांचे आभार मानले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. राजमाता अहिल्यादेवी होळकर याचं नांदेड येथे स्मारक व्हावे असा ठराव आ.मोहन हंबर्डे यांनी सभागृहात मांडला त्यास बालाजी वैजाळे यांनी अनुमोदन दिले आ.श्यामसुंदर शिंदे यांनी ऑनलाईन पाठींबा दिला व ठराव एक मतांनी पास करण्यात आला.नांदेड शहरांत राजमाता अहिल्यादेवी होळकरांच भव्य स्मारकासाठी जागा निश्चित करण्यासाठी त्रिस्थरीय समितीची स्थापना करण्यात आलीआहे.जिल्हाधिकारी,मनपा आयुक्त,जीप सिओ यांचा या समितीत सहभाग आहे.

आज राजमाता अहिल्यादेवी स्मारक होण्यासाठी आंदोलत्मक पवित्र घेतल्याने नियोजन समितीचे सदस्य बालाजी वैजाळे यांनी सतत पाठपुरावा केला.आज मा.आ.हंबर्डे यांच्या माध्यमातून ठराव पास करून घेण्यात आल्याबद्दल समितीच्या वतीने सर्वांचे अभिनंदन करण्यात येते आहे. तसेच उपोषण व आंदोलनात सहभाग भाग घेतल्या बद्दल सर्वांच्या वतीने एडवोकेट कोकणे प्रशांतप्रभू, गोविंद बने, गोविंद गोरे, बाळासाहेब बारसे, मारोतराव उबाळे, माधव बारसे, बळीराम ढेकाळे, याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी