हदगाव, शे चांदपाशा| हदगाव शहरासह तालुक्यात विविध प्रसिद्ध शालेय संस्थाचे विद्यार्थी पण हम भी कुछ कम नहीचा प्रतय दिसुन आले.
जिल्हा परिषद हायस्कूल हदगाव शहरात मराठी माध्यम व उर्दू माध्यमचे वर्ग असुन, या मध्ये 2021-22 या वर्षीच्या माध्यमिक शालांत प्रमाणपञ परिक्षेचा निकाल 88.%टक्के लागला आहे. या मध्ये (मराठी -उर्दू ) विद्यार्थी शालांत परिक्षेला 84 बसले होते या मध्ये 15विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उतिर्ण झाले तर 21विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 11 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उतीर्ण झाले माराठी माध्यमचा 75% निकाल लागला.
उर्दू माध्यामचा 100% -हदगाव शहरात जिल्हापरिषद हायस्कूल मध्ये उर्दू विभागाचे शालांत परिक्षेत अनेक विषय शिक्षक नसताना घवघवीत यश उर्दू माध्यमच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले या मध्ये जि.प.हायस्कूल (उर्दू विभाग )मधील अदीबा शेख अजीम या विद्यार्थीने 87% घेऊन प्रथम क्रमांक पटकविला तर सानिया मौला शेख ने पण 87.20 %गुण घेवून द्वितीय क्रमांक मिळविला तर शेख जीनेरा आयुब या विद्यार्थीने 85% घेवुन तिसरा क्रमांक आणखी विशेष म्हणजे सादीया मोहीद्दीन या मुलीने तर समाजशास्ञा या विषयात 100 पैकी 100गुण मिळविले आहे.
विशेष म्हणजे जिल्हा परिषद हायस्कूल (उर्दू )माध्यमला गेल्या दहा वर्षापासून नादेड शिक्षण विभागाने पद नियुक्ती केले मान्यपदे 03असुन, देखील जानून बुजुन माध्यमिक शिक्षकाची नियुक्त करण्यात येत नाही. अणखी विशेष म्हणजे ज्या विषयांचे माध्यमिक शिक्षक नाहीत. त्या विषयासाठी उर्दू माध्यमाचे शिक्षकांनी स्वतःचे पैशे व शहरातील काही शिक्षण प्रेमी दानशुर नागरिकांच्या लोकवर्गणीतुन शिक्षित 4ते 5 मुलींची नेमणूक करुन त्या त्या विषयांचे विद्यार्थ्यांकडून करुन घेतात. हे गेल्या अनेक वर्षापासुन हा सामाजिक स्वयप्रेणने उपक्रम राबविला जातो. हे आवर्जून उल्लेखनीय बाब असुन, परिणाम स्वरुप हे यश मिळत आहे. अणखी विशेष म्हणजे जर शिक्षण विभाग उर्दू माध्यमाच्या शिक्षणाकडे कान डोळा करत असले तरी अल्पसंख्याक मुस्लिम समाज शिक्षणाच्या बाबतीत जागरुक झालेला दिसुन येत आहे.
पालमंञी आशोक चव्हाण कडुन अपेक्षा ... दहा वर्षा पुर्वी जिल्हा परिषद हायस्कुलला केवळ 1ते 7 पर्यत वर्ग होते तेव्हा शहरातील पालक व नागरिकांनी नादेड जिल्ह्याचे पालकमंञी आशोकराव चव्हाण यांच्याकडे दहा वर्षापुर्वी ऊर्दूच्या 10 वर्गाकरिता आग्रह धरला होता. तेव्हा त्यांनी 10 व्या वर्गाला संबंधित अधिका-याना स्वतः संपर्क साधून त्यांनी हदगाव शहरातील उर्दू माध्यमच्या विद्यार्थ्यांना 10व्या वर्गाला मान्यता मिळवून दिली होती हे आवर्जून उल्लेख करावा लागेल.