माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या अर्जावर जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या दालणात पैनगंगा अभयारण्य पर्यावरण सनियंत्रन समितीची सभा -NNL


किनवट, माधव सूर्यवंशी|
माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या अर्जावर जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या दालणात पैनगंगा अभयारण्य पर्यावरण सनियंत्रन समितीची सभा दिनांक २० जुन २०२२ रोजी यवतमाळ येथे घेण्यात आली ज्यामध्ये माजी आमदार प्रदीप नाईक, उपवनसंरक्षक पुसद ए. एल. सोनकुसरे, सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण एच पुजार, पांढरकवडा चे उपवनसंरक्षक जगताप, राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता साहुत्रे, उपअभियंता हटकर यांची विशेष उपस्थिती होती.

किनवट शहर व तालुक्यात निर्माणाधिन असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ (ए) ची रुंदी चुकीच्या पध्दतीने इको सेन्सेटीव्ह झोन चे निमित्त करत शहरात जिजामाता चौक ते अशोक स्थंभ अशी १८ मिटर करण्यात आली होती ज्यामुळे गोकूंदा येथिल रेल्वे ओवर ब्रिज होऊ शकनार नाही कारण रेल्वे ओव्हर ब्रिज करिता किमान ३० मिटर रुंदीचा मार्ग आवश्यक असतो. तरी भविष्यातील किनवट तालुक्याची दळणवळाची गरज पाहता माजी आमदार प्रदीप नाईक यांनी रुंदी वाढवण्याकरिता पुढाकार घेतला ज्या करिता विविध बैठका आयोजित करण्यात आल्या ज्यामध्ये त्यांनी विद्यमान आमदार भिमराव केराम यांनी देखिल साथ दिली व शहरात महामार्गाची रुंदी हि ३० मिटर रुंद अशी्च व्हावी अशी भुमिका आजी माजी लोकप्रतिनिधींनी घेतली.

तरी दिनांक २० जुन रोजी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पैनगंगा पर्यावरण सनियंत्रण क्षेत्राच्या समितीच्या सभेमध्ये समितीचे अध्यक्ष अमोल येडगे जिल्हाधिकारी यतमाळ, समितीचे सचिव ए. एल. सोनकुसरे उपवनसंरक्षक यवतमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व यंत्रणाची सांगड घालत व सगळी डॉक्युमेंट तपासणी करुन सर्व बाजुंचे म्हणणे ऐकुण घेतले ज्यामध्ये माजी उपनगराध्यक्ष यादवराव नेम्मानिवार यांच्या अध्यक्षतेतील किनवट संघर्ष समिती व त्यांचे पदाधिकारी देखिल आपली बाजु मांडण्याकरिता त्यावेळी उपस्थित होते.

माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात माहुर चे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, शिवसेनेचे व्यंकट भंडारवार, रा.कॉचे ता. अध्यक्ष प्रकाश राठोड, जिल्हा परिषद सदस्य प्रविण म्याकलवार, राहुल नाईक, डॉ रोहिदास जाधव, कचरु जोशी , संजीत बॅनर्जी, यांची उपस्थिती होती तर किनवट संघर्ष समिती तर्फे यादवराव नेम्मानिवार, माजी नगराध्यक्ष के.मुर्ती, सुनिल वट्टमवार, ऍड. दिलिप कोट्टावार, नौशाद खान, गिरिष नेम्मानिवार, किशन राकोंडे, सुशिल जन्नावार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

तर किनवट तालुक्यातील पत्रकार संघातर्फे एकुण झालेल्या घडामोडीचे वार्तांकन करण्याकरिता यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय येथे ज्येष्ठ पत्रकार प्रदिप वाकोडीकर, शकिल बडगुजर, किशन भोयर, गोकुळ भवरे, प्रमोद पोहरकर, फुलाजी गरड, कचरु जोशी यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यवतमाळ यांची भेट घेतली. तरी आयोजित बैठकीत सर्व बाजुंचे म्हणणे ऐकुण घेतले आहेत. यावर येत्या सात दिवसात निर्णय घेण्यात येईल असे यावेळी पर्यावरण समितीचे अध्यक्ष यवतमाळ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकारांना सांगितले. तर किनवट शहरातुन ३० मिटर रुंद असा राष्ट्रीय महामार्ग बनवण्याकरिता सर्व प्रशासकीय यंत्रणा ह्या सकारात्मक असल्याचे एकंदरीत स्थितीवरुन निदर्शनास येत होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी