नांदेड| पांगरी रस्त्यामुळे चोऱ्याचे प्रमाण वाढल्याची हास्यास्पद तक्रार करत हा रस्ता बंद करण्याच्या हालचाली सुरु असून या प्रकारास गावकऱ्यानी विरोध केला आहे. रस्ता बंद न करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.
विष्णुपूरी ते पांगरी हा रस्ता अनेक पिढ्यांपासून आहे. विष्णुपूरी ते पांगरी दोन किमी असल्याने रस्ता बंद केल्याने विद्यापीठाला वेढा घालून गावात यावे लागणार आहे. चोऱ्या होत असल्याने रस्ता बंद करणे हा पर्याय नाही. शहरात अनेक ठिकाणी चोNया होतात. रस्ता बंद करण्याचा प्रकार सुरु झाल्यास सर्वच रस्ते बंद करावे लागतील.
वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय परिसरात कॅमेरे बसविलेले आहेत. सुरक्षा रक्षक तैनात आहेत. असे असतांना रस्ता बंद करणे हा पर्याय नसून रस्ता बंद केल्यास सामुहिम आत्मदहन करण्याचा इशारा गावकNयांनी जिल्हाधिकाऱ्याना निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर गजानन मेकाले, गिरीष पांगरेकर, हणमंत घोगरे, गोविंद चौधरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.