नांदेड| आरक्षण हक्क संवर्धन समिती नांदेडच्यावतीने दि. ९ जून २०२२ गुरुवार रोजी सायंकाळी ठिक ७ वाजता सावित्रीबाई जोतीराव फुले पूर्णाकृती पुतळा आयटीआय चौक, नांदेड येथे विर आदिवासी नेता, महान स्वातंत्र्य सेनानी, क्रांतीसूर्य, धरती आबा बिरसा मुंडा यांचा १४७ वा स्मृतीदिन साजरा करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी मन्नेरवारलू समाज सुधारक मंडळाचे जेष्ठ नेते सोपानराव मारकवाड, शिवसेनेचे जेष्ठ नेते प्रविण जेठेवाड, आरक्षण हक्क संवर्धन समिती महाराष्ट्राचे संघटक तथा कार्यक्रमाचे मुख्य संयोजक शाम निलंगेकर, मन्नेरवारलू समाज सुधारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय अन्नमवाड, बंजारा क्रांती दलाचे सुरेश राठोड, ओबीसीचे नेते ऍड. प्रशांत कोकणे, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, वंचित बहुजन आघाडीचे यशवंत थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते उलगुलान चळवळीचे जनक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपरोक्त सर्व मान्यवरांची बिरसा मुंडा यांच्याप्रती समयोचित भाषणे झाली. यावेळी सर्वच मान्यवरांनी बिरसा मुंडा यांना भारत स्वातंत्र्यासाठी व आदिवासी बहुजनांसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने मरणोप्रांत भारतरत्न हा पुरस्कार बहाल करुन गौरवण्यात यावे व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने बिरसा मुंडा यांचे स्मारक उभारुन येणार्या भावी पिढीला एक आदर्श निर्माण करावा अशीही मागणी यावेळी सर्वांनीच केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार यशवंत थोरात यांनी मानले. या अभिवादन सभेस मोहनराव गोपुलवाड, संभाजी कास्टेवाड, सचिन पुंडगे, ऍड. यशवंत मोरे, संतोष बोनलेवाड, निलेश बादेवाड, माधवराव कोंडरे, बंटी शिंगटवार, गंगाधर ओडने, धम्मा सरोदे, धनराज जोगदंड हे उपस्थित होते.