जि.प च्या शिक्षण विभागाच्या नाकर्तेपणामुळे बांगडीचा आहेर जिल्हाध्यक्ष सुनिल पा. कदम यांचा इशारा
नांदेड। नांदेड शहरामध्ये मान्यता नसलेल्या नारायणा स्कूल बंद करा अन्यथा जिल्हा परिषदेवर भव्य बांगडी मोर्चा धडकणार असा इशारा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील कदम यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे सुनील पा.कदम यांचा अर्ज जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागास दिनांक 2/5/2022 17/05/2022 पर्यत अनेकवेळा तक्रार देवुनही शिक्षण विभाग जागा होत नाही म्हणून मोर्चा करण्याचे ठरवले होते तद्नंतर आजपर्यंत सदरील प्रकरणी कोणतीही कार्यवाही केलेली नाही याचाच अर्थ आपण कारवाई करण्यास धजत नाहीत किंवा संबंधित संस्थाचालकाशी संगणमत करुन त्यांना पाठीशी घालण्याचा डाव खेळत आहेत व कारवाईस विलंब करत आहेत तद्नंतर 26/05/2022 रोजी दिलेल्या निवेदना नंतर प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार सदरील प्रकरणी एक कमिटी स्थापन करण्यात आली त्यामुळे तूर्तास सदरील भव्य बांगडी मोर्चा स्थगित केला होता त्यात स्थापन झालेल्या कमिटीचा कुठलाही अहवाल दिला नाही व वेळ मारुन नेण्याचं काम केले जात आहे.
लोहा पंचायत समितीचे विद्यमान गटविकास अधिकारी रविंद्र सोनटक्के,प्रभारी गटशिक्षणाधिकारी रुस्तम आडे,शिक्षण विस्तार अधिकारी के.के.मेकाले यांचा समावेश होता याचा कसलाही अहवाल प्राप्त न झाल्याने दि.०९ जून २०२२ रोजी पुन्हा भव्य बांगडी मोर्चा येत्या १३ जून २०२२ रोजी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुनिल पा.कदम यांच्या नेतृत्वात क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या स्मारकापासून ते जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागापर्यत भव्य बांगडी मोर्चा धडकणार आहे शिक्षण विभाग प्राथमिक व शिक्षण विभाग माध्यमिक या दोन्ही शिक्षणाधिका-यांच्या नाकर्तेपणामुळे व खाबूगिरीमुळे शिक्षण विभाग मल्लीन होत चालला आहे व नांदेड शहरात अशा बोगस शाळा उदयास येत आहे नारायणा सारख्या बोगस शाळा अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन बोगसगिरीचा विक्रम केला आहे.
भोळ्या भाबड्या आंध्रप्रदेशातील हैद्राबादच्या शिक्षण पध्दतीचा अमिष दाखवून शासन नियम धाब्यावर बसवून पालकांची फसवणूक केली आहे. या शाळेत व शिक्षण विभागात सदरील शाळेच्या मान्यतेच्या दस्ताऐवजांची मागणी केली असता शिक्षण अधिकारी व नारायणा शाळेने ते देण्यास असमर्थ दाखवली. मुळ दस्तऐवज तक्रारदारास दिले नाहीत याचाच अर्थ असा की , दोघांच्या संगणमताने विद्यार्थी व पालकांची फसवणूक होत असल्याचे निर्दशनास येत असल्याने स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने संविधानिक मोर्चाचे हत्यार उपसले आहे. प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या नाकर्तेपणामुळे संबंधित अधिका-यांची विभागाबाहेर बदली होईल का याकडे पालकांचे लक्ष वेधले आहे.