सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करून गाव शाश्वत स्वच्छ ठेवा - मुकाअ.वर्षा घुगे-ठाकूर-NNL


नांदेड।
सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करून गाव शाश्वत स्वच्छ ठेवावे, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

आज गुरुवार दिनांक 30 जून रोजी अर्धापूर तालुक्यातील मेंढला खुर्द येथे त्यांनी भेट देऊन सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांची पाहणी केली. तसेच शाळा व  गृहभेटीतून त्यांनी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर. पाटील, गट विकास अधिकारी डी. एस. कदम, उप अभियंता कार्लेकर, स्वच्छता तज्ञ विशाल कदम, विस्तार अधिकारी व्ही.एम. मुंडकर, एस. पी. गोखले, ग्रामसेवक दत्तात्रय थोरात, गट समन्वयक, जाधव मुख्याध्यापीका छाया दिनकर,, शिक्षक व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. 


मुख्य कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनातील शोषखड्डे, खत खड्डे, स्थरीकरण तळे आदी कामांची पाहणी केली. तांत्रिकदृष्ट्या ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जलजीवन मिशन अंतर्गत कुटुंबांना देण्यात येणाऱ्या वैयक्तिक नळ जोडणीची  गृहभेटीतून त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व महिलांशी संवाद साधला.  

शालेय पोषण आहाराचा घेतला स्वाद


मेंढला खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत सीईओ वर्षा ठाकूर-घुगे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मध्यान भोजनाचा स्वाद घेतला. शाळा हे संस्काराचे केंद्र असून शिक्षणासह वाचन, खेळ, नैतिक मूल्यांचे शिक्षण मुलांना द्यावे असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी स्टोअर रूम, वर्गखोली, पाणी पुरवठा, सीड बॉल, विद्यार्थी गृहपाठ, शाळा परिसर व मुला-मुलींसाठी असलेल्या स्वतंत्र शौचालय सुविधेची त्यांनी पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला व शिक्षकांना मार्गदर्शन केले. सुमारे तीन तास गावात विविध कामांची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच गावातील युवक-युवतींशी देखील त्यांनी स्पर्धा परीक्षेसंदर्भात चर्चा केली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी