नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त पक्ष कार्यालय डॉक्टर लेन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच नवनिर्वाचित पक्षाचे उपाध्यक्ष तथा नांदेड शहर पक्ष निरीक्षक मकबुल सलीम यांच्या नेतृत्वाखाली दि. 10 जून रोजी आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी शहर कार्यकारिणीच्यावतीने मकबुल सलीम यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, पक्ष निरीक्षक मकबुल सलीम, माजी विरोधी पक्षनेता जीवन पाटील घोगरे, ज्येष्ठ सय्यद मौला, तातेराव पाटील आलेगावकर, बंटी लांडगे, अल्ताफ अहेमद सानी, श्रीधर नागापूरकर, भीमराव क्षीरसागर, कन्हैया कदम, जिलानी पटेल, गंगाधर कवाळे पाटील, धनंजय सुर्यवंशी, दत्ता पाटील तळणीकर, मोहसीन खान पठाण, अॅड. प्रकाश घोगरे, प्रकाश मुराळकर, युनूस खान, विलास गजभारे, लक्ष्मण भवरे, जयश्री काटकर, रोहित कोलंबीकर, सिंधुताई देशमुख, नागमणी चलवदे, सुनंदा पाटील, महेश्वरी गायकवाड, मारोती चिवळीकर, शंकर कदम, डॉ. दत्तात्रय कदम, राहूल जाधव, शफी उर रहेमान, गजानन लुटे, बच्चू यादव, अनिकेत कांबळे, आकाशसिंह ठाकूर, अंकुश पाटील शिखरे, पाशा खान तांबोळी, तिलक यादव, बाळू गोरे, गजानन वाघ, शेख रसूल, रहेमत अली खान, स. मनबीरसिंघ ग्रंथी, सरफराज अहेमद, बालाजी बोकारे, बालाजीसिंह ठाकूर, मो. नजीब, गोविंद यादव, सय्यद अहेमद, फैसल सिद्धीकी, रोहित पवार, अमर हनुमंते, विनोद जानकर, ज्ञानेश्वर जानकर, सूजर सुंकरवार, नितीन जानकर आदी जणांची उपस्थिती होती.
घर-घर राष्ट्रवादी अभियानाचा शुभारंभ - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मागील 22 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली जनसामान्यांचे प्रश्न सोडवित आहेत. पुढील काळातही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कटीबद्ध आहे. घर-घर राष्ट्रवादी अभियानांतर्गत प्रत्येक घरावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा व दरवाज्यावर स्टीकर हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.
10 जून ते 16 जून या दरम्यान वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, ज्येष्ठ नागरीक सन्मान, पर्यावरण जनजागृती, पुरोगामी विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व इतर महत्वाच्या व्यक्तींच्या विचारांवर आधारीत व्याख्यान आयोजित केले आहेत, आदी स्वरूपाची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांनी दिली.