नांदेड। महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची नांदेड जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी तर कार्याध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबकले यांची निवड करण्यात आली आहे. कोषाध्यक्ष पदी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद चन्ना तर सचिवपदी जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र पवार यांची निवड झाली आहे.
अध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे, तहसिलदार किरण अंबेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आरती काळम, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. अविनाश बुन्नावार, सहसचिवपदी नायब तहसिलदार मकरंद दिवाकर, राज्यकर अधिकारी माधव पुरी, सहाय्यक रासायनिक विश्लेषक डॉ. हरिशचंद्र जिरमाली, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी निमसे, पशुधन विकास अधिकारी डॉ. अजय मुस्तरे यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा संघटक पदी निवृत्त जिल्हा नियोजन अधिकारी नामदेव पतंगे, निवृत्त शिक्षणधिकारी श्रीमती जयश्री गोरे, मायम निमंत्रीत म्हणून अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांना जबाबदारी देण्यात आली आहे. महिला प्रतिनिधी म्हणून तहसिलदार श्रीमती मंजुषा भगत, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रेणुका तम्मलवार, सहाय्यक संचालक श्रीमती शुभांगी देवणीकर तर प्रसिद्धी सचिव पदाची जबाबदारी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांना दिली आहे.