इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची मोफत सोय -NNL

समाज कल्याण विभाग नांदेडचे आवाहन


नांदेड।
श्री.जवाहरलाल नेहरू शिक्षण प्रसारक मंडळ नांदेड या संस्थे अंतर्गत चालणाऱ्या शांती निकेतन पब्लिक स्कूल मालेगाव ता. अर्धापूर जि.नांदेड या इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत शासन आदेशानुसार विमुक्त जाती व भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर हाटकर समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची मोफत सोय करण्यात आली आहे.

मोफत शिक्षणासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये कमाल मर्यादा,२०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे,जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश आल्यास ड्रा पध्दतीने काढण्यात येणार आहे,पहिली ते पाचवी या वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त ,समाज कल्याण कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन व मुख्याध्यापक शांती निकेतन पब्लिक स्कूल मालेगाव मो नंबर ८६६८७०२६८४ यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी