हिमायतनगर येथे वीज कोसळून शेक लागल्याने युवा शेतमजूर गंभीर जखमी -NNL


हिमायतनगर, अनिल मादसवार।
मृग नक्षत्राच्या तिसऱ्या दिवशी हिमायतनगर शहर व परिसरात वादळी वारे, विजांचा कडकडाट होऊन पाऊस झाला. दरम्यान शहरानजीक एका झाडावर वीज कोसळली, याच वेळी घराकडे येत असलेल्या शेतकरी येथून येत असताना कोसळलेल्या विजेचा जबरदस्त शेक लागल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. सुरेश परमेश्वर टोमके, वय 30 वर्ष असे त्या जखमी शेतकऱ्याचं नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या काही महिन्यांपासून उकाड्याने सर्वांना हैराण करून सोडले, मृग नक्षत्र लागुणही पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांना व सर्व सामान्य माणसाला पावसाची प्रतीक्षा होती. आज सायंकाळी आभाळ दाटुन आले, त्यामुळे पाऊस होईल अशी अपेक्षा सर्वांना होती. दरम्यान सायंकाळी6 वाजता विजांचा कडकडाट आणि वादळी वारे सुरू झाले, त्यामुळे घर जवळ करण्यासाठी येथील युवा शेतकरी सुरेश परमेश्वर टोमके, वय 30 वर्ष, रा. सराफा लाईन, हिमायतनगर हा वाटेने निघाला होता.


याच वेळी वीज जोरात कडाडली आणि वाशिकर यांच्या शेतानजीक रस्त्यावरील झाडावर कोसळली, दरम्यान खडकी पांदण रस्त्यावरील शेताकडून शेतकरी गावाकडे येत असल्याने कोसळलेल्या विजेचा जबरदस्त शेक शेतकऱ्यांस लागल्याने कमरेपासून खालील भागावर गंभीर परिणाम झाला. आणि यात त्यांचे पाय भाजून गेले आहेत. हा प्रकार लक्षात येताच तातडीने नागरिकांनी त्या जखमी झालेल्या शेतकऱ्यांस येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले, येथे वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक उपचार करून परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला रेफर करण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी