हिमायतनगर। तालुक्यातील मौ. दूधड येथे दि 11 जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास पांडुरंग आंनदराव सूर्यवंशी यांच्या शेतात गोठ्यात बांधलेल्या बैलावर वीज पडल्याने एक बैल दगावल्याची घटना घडली आहे.
हिमायतनगर तालुक्यात शनिवारी दुपार पासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी अचानक विजांच्या कडकडाटासह वादळी वारा सुरू झाला होता. यातच दूधड येथील शेतकरी पांडुरंग आनंदराव सूर्यवंशी गट क्र. 275 यांच्या शेतात रोजच्या प्रमाणे खुट्याला बांधलेल्या एका बैलावर संध्याकाळी सहाच्या सुमारास वीज कडाडली यात एक बैल जागीच ठार झाला झाल्याची घटना घडली आहे. यामुळे ऐन पेरणी च्या तोंडावर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
हिमायतनगर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला असल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे रात्रभर काही गावात विज पुरवठा बंद झाल असल्यामुळे नागरीकांना रात्र अंधारात काढावी लागली आहे.दूधड येथील शेतकऱ्यांचे बैल ठार झाल्याने नैसर्गिक आपत्ती मुळे नुकसान झाले असून तहसील प्रशासनाने पंचनामा करून मदत देण्याची मागणी केली आहे.