सौ.संताबाई निवृत्ती भिसे यांचे निधन -NNL


उस्माननगर|
जेष्ठ नागरिक सौ.संताबाई निवृत्ती भिसे यांचे दि.२९ जून बुधवारी सकाळी खाजगी दवाखान्यात उपचार दरम्यान दुःखदायक निधन झाले. मृत्यूसमयी त्या ६३ वर्षाच्या होत्या. 

येथील ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी गंगाधर निवृत्ती भिसे ,शिराढोण येथील आश्रम प्राथमिक शाळेचे सहशिक्षिक डिगांबर भिसे, पंजाब येथे कार्यरत असलेले भारतीय सैनिक सुभाष भिसे यांच्या मातोश्री कष्टाळू, मेहनती, शांतस्वभावाच्या सौ.संताबाई निवृत्ती भिसे वय ६३ वर्ष यांचे दि.२९ जून बुधवारी सकाळी खाजगी दवाखान्यात उपचार दरम्यान दुःखदायक निधन झाले. गुरुवार सकाळी दहा वाजता उस्माननगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पती , तीन मुले,सूना, नातवंड असा परिवार आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी