नांदेड| संस्कार-गुणवत्ता-प्रगती या त्रिसूत्रीच्या माध्यमातून जि.प.हायस्कुल विष्णुपूरी शाळेने नुतन विद्यार्थी पहिले पाऊल कार्यक्रम अत्यंत उत्साहात घेतला. या कार्यक्रमास जि.प.नांदेडचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्हि.आर.पाटील, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, बालाजी नागमवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रथम तुबाकले यांच्या हस्ते पहिलीतील प्रवेशीत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. यानंतर कु. तन्वी दिनेश पुरी हिच्या पहिल्या पाऊलाचा ठसा डॉ संजय तुबाकले यांनी स्वतः घेतला तसेच तिचे नाव लिहून तिच्या व पालकांसोबत सेल्फीही काढली. याप्रसंगी निर्मित सात शैक्षणिक स्टाँलचे उद्घाटन करुन स्टाँलला भेट देवून समाधान व्यक्त केले. शाळेचा भव्य हिरवाईने नटलेला परिसर पाहून विविध वर्गांस भेट दिली.
यासमयी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास आबासाहेब देशमुख हंबर्डे व उपाध्यक्ष साहेबराव हंबर्डे यांनी सर्व मान्यवरांचे सुसज्ज व सुबक अशा शालेय काँन्फरन्स हाँलमध्ये स्वागत केले. आपले मनोगत व्यक्त करतांना तुबाकले यांनी शाळेची शैक्षणिक, भौतिक व सांस्कृतिक प्रगती पाहून एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आल्याची जाणीव झाल्याची भावना व्यक्त केली. पालक माजी सैनिक शिवाजी हंबर्डे यांनी पाल्यांविषयी आपली सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली. कार्यक्रमाचे निवेदन-सुत्रसंचालन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी यांनी केले.
यावेळी उपसरपंच विश्वनाथराव हंबर्डे, शहाजी हंबर्डे, शिक्षण विस्तार अधिकारी केशव मेकाले, ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक माणिकराव हंबर्डे, राजेश हंबर्डे,माजी गटशिक्षणाधिकारी एम.आर.राठोड,संभाजी शेंबोले, गोविंदराव हंबर्डे,रामराव देशमुख, मुख्याध्यापक एन.एन.दिग्रसकर आणि बहुसंख्य पालक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम उदय हंबर्डे, श्रीपाद बोरीकर, मिरा रेवनवार,शिवनंदा माट्रलू, प्रिती कंठके, अर्चना देशमुख, शकुंतला पाईकराव, दत्ता केंद्रे,सोमनाथ बिदरकर, सदानंद गुरुपवार,कृष्णा बिरादार, शिवाजी वेदपाठक, एम.ए.खदीर, विकास दिग्रसकर, धनगे,मारोती काकडे,दिनेश अमिलकंठवार तथा समस्त शिक्षक कर्मचारी यांनी घेतले.