पुणे। राष्ट्रीय हत्तीरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग व व्हायटल स्टेट्रझी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने तयार केलेल्या सॉफ्टवेअरचे पायलट टेंस्टिग प्रशिक्षण राज्यस्तरीय मास्टर प्रशिक्षक यांचे आयोजन करण्यात आले होते.
भारता मध्ये फक्त महाराष्ट्रात राष्ट्रीय हत्तीरोग दुरीकरण कार्यक्रम सॉफ्टवेअर पायलट प्रोजेक्ट म्हणून तयार करण्यात येत आहे अशी माहिती डॉ स्वप्नील लाळे, सह संचालक आरोग्य सेवा (हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग) पुणे यांनी सांगितले. प्रशिक्षणार्थी यांना माहिती व मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय हत्तीरोग दुरीकरण कार्यक्रमाचे सॉफ्टवेअर प्रि लॉन्च करण्याचे राज्यस्तरीय प्रशिक्षण मास्टर प्रशिक्षक यांचे दि.२१ व २२ जून रोजी सयाजी हॉटेल वाकड पुणे येथे महाराष्ट्रातील सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हिवताप), हत्तीरोग ग्रस्त जिल्हाचे १८ जिल्हा हिवताप अधिकारी पालघर ,रायगड जळगाव ,सोलापूर सिंधुदुर्ग, औरंगाबाद, नांदेड, लातूर , उस्मानाबाद, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा,गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली तसेच हत्तीरोग अधिकारी नांदेड,नाशिक, पालघर, ठाणे मनपा,नागपूर, नागपूर मनपा अधिकारी व माहितीगार कर्मचारी यांना राज्यस्तरीय मास्टर प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण देण्यात आले.
महाराष्ट्र हा हत्तीरोग ग्रस्त राज्य म्हणून ओळखल्या जाते. हत्तीरोग रुग्ण व अंडवृद्धी रुग्ण यांची अद्ययावत माहिती या सॉफ्टवेअर डाटा एन्ट्री करण्यात येणार आहे. तसेच एमडीए, प्रि टास, टास, आयडीए, अंडवृद्धी शस्त्रक्रिया ईत्यादी माहिती या मध्ये असणार आहे. दि.२५ जुलै २०२२ पर्यंत महाराष्ट्रातील हत्तीरोग ग्रस्त जिल्ह्या मध्ये जिल्हा व तालुका स्तरावर प्रशिक्षण आयोजित करून संपूर्ण डाटा एन्ट्री करण्याचे नियोजन करण्याविषयी सांगितले. व्हायटल स्टेट्रझीचे डॉ निधी चौधरी प्रिन्सिपल टेक्निकल अँडव्हायझर, डॉ सीमा पटेल सिनियर मँनेजर, बाला सर, शाम सर यांनी सॉफ्टवेअरची माहिती व प्रशिक्षण दिले हत्तीरोगाची सद्यस्थिती, त्यामधील काही दुरुस्ती करणे व सामुहिक चर्चा करण्यात आली.
डॉ बी.एस.कमलापुरकर मँडम सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हत्तीरोग) पुणे, डॉ राजेंद्रकुमार सिंह डब्ल्यूएचओ व एनटीडी राज्यस्तरीय समन्वयक, सोमाजी अनुसे राज्य कनिष्ठ किटकशास्रज्ञ, प्रशिक्षणाचे व्यवस्थापन हत्तीरोग राज्यस्तरीय समन्वयक गिरीश सपकाळ सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी पुणे जिल्हा, दादाराव जांभळे आरोग्य सहाय्यक, श्रीमती अश्विनी कवडे सल्लागार, सहसंचालक आरोग्य सेवा (हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग) पुणे या कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी व्यवस्थापन केले.
यावेळी हेमराज कार्लेकर कन्सल्टंट, महाराष्ट्रातील सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) डॉ संजय ढगे लातूर, डॉ विनित फालके कोल्हापूर, डॉ दत्तात्रेय घोलप औरंगाबाद, डॉ सोनवणे सर ठाणे, डॉ पु.ना.गांडाळ नाशिक, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ शेख रहिम लातूर, डॉ मधुकर पांचाळ उस्मानाबाद, डॉ सागर पाटील पालघर, डॉ रमेश करतकर सिंधुदुर्ग, डॉ वेदप्रकाश चोरगडे गोंदिया, डॉ कुणाल मोडक गडचिरोली, डॉ प्रतिक बोरकर चंद्रपूर, डॉ शरद जोशी अमरावती, डॉ सय्यद जुनेद अकोला, डॉ रविंद्र ढोले औरंगाबाद, हत्तीरोग अधिकारी डॉ राजेंद्र त्र्यंबके नाशिक, सत्यजीत टिप्रेसवार नांदेड, दामोदर लांजेवार भंडारा, श्याम कांबळे वसई, प्रविण चिंचोळकर वर्धा, चेतन शेंद्रे भंडारा, गणेश पारखी पुणे आदी राज्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा निहाय अधिकारी यांच्या कडून या सॉफ्टवेअर मध्ये दुरुस्ती व नविन काही बद्दल या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शेवटी राज्यस्तरीय प्रशिक्षणाचे समारोप व आभार डॉ.बी.एस. कमलापुरकर मँडम यांनी केले.