नविन नांदेड। कुसुमताई प्राथमिक शाळा सिडको नांदेड येथे 21 जून 2022 रोज मंगळवार या दिवशी आठवा योग दिन विद्यार्थी, शिक्षकवृंद समवेत साजरे करण्यात आले. उपस्थित शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांना योग दिनाचे औचित्य साधून योगा ची उद्दिष्टे, त्याचे असलेले आपल्या जीवनातील रहस्यमय महत्त्व व त्यापासून आपल्याला होणारे लाभ, तसेच साखरे ऐवजी गुळाचा वापर, सद्यस्थितीतील डॉक्टरांची लयलूट यापासून मुक्ती मिळवायची असेल तर नियमित योगा केले पाहिजे तसेच आपल्या दैनंदिन जीवनातील रूपरेषा, शरीर सुदृढ तर मन आणि विद्यार्थी सुदृढ, विद्यार्थी सुदृढ तर आपला भारत देश सक्षम रित्या सुदृढ होऊन प्रगतीपथावर जाईल असे सूचक मार्गदर्शन केले.
आणि आपल्या सवयी, त्याच बरोबर आपले खानपान याची सर्व माहिती योगशिक्षक व्ही.डी. बिरादार सरांनी सांगितले आहेत.आणि विद्यार्थ्यांना योगाचे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष कृती करून दाखवले. त्यांच्याकडूनही कृती करून घेतले,यावेळी प्रशालेचे सर्व शिक्षक वृंद, शिक्षिका उपस्थित होते. या सर्वांना नियमित योगा करण्याचे संदेश दिले आहे.