दहावीच्या परीक्षेत त्रिमूर्ती विद्यालयाची सुप्रीया कांबळे मागासवर्गीय मुलीत प्रथम -NNL


उस्माननगर, माणिक भिसे।
कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुप्रीया लक्ष्मण कांबळे हीने  ७८ टक्के  गुण घेऊन मागासवर्गीय मुलीमधून  एस एस सी बोर्ड परीक्षेत  सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला आसून शाळेचा १००% निकालासह घवघवीत यश संपादन केले आहे.

शाळेच्या यशाचा आलेख उंचावला आहे.या यशाबद्दल संस्थेचे सचिव मा.बालाजी पाटील पांडागळे यांच्यासह इतरांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.नुकतेच प्रसिद्ध झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत त्रिमूर्ती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखत दैदिप्यमान यशाला गवसणी घातली आहे. कोरोनामुळे उद्दभवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीनंतर प्रथमच विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जात यशाला गवसणी घातली आहे.

विद्यालयातील एकूण परीक्षेसाठी ३८ प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी १७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत तर १८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून तीन विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आहेत.या निकालात ८५ टक्के गुण घेऊन घोगरे आदित्य प्रसन्न सर्वप्रथम,८४.४० टक्के गुण घेऊन घोरबांड शरद आनंदराव सर्वद्वितीय तर ८३.८० टक्के गुण घेऊन सुक्रे शिवानंद शंकर हा तृतीय स्थानी आहे.उस्माननगरसारख्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांनी प्राप्त परिस्थितीला सामोरे जाऊन यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे बालाजीराव पाटील पांडागळे ,मुख्याध्यापक  शिवसांब कोरे यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी व  शाळेतील सहशिक्षक भगवान जाधव,सौ.सुरेखा डांगे,विठ्ठल चिवडे,बस्वराज धानोरकर आदींनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी