नांदेड/मालेगाव, सुभाशिष कामेवार। नांदेड वसमत महामार्गावर गुरूवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मालेगाव शिवारात वालुर येथील तिरुमला फुड कंपनीचा चालक गौतम वाठोरे हळद पावडर धर्माबाद येथील जनता किराना व्यापाऱ्याला विकुन त्याची रक्कम घेऊन पुन्हा वालुर जि परभणी कडे जात असताना सायंकाळी 6 चा सुमारास मालेगाव पासुन 1 कि.मी अंतरावर असलेल्या धामदरी पाटी पाशी बोलोरो पिकअप गाडीला क्र.एम. एच. 22 एन 0739 ला थांबवुन विना नंबरच्या लाल पल्सर गाडीवर आलेल्या दोघांनी चालकाच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारत चालकाला रस्ताच्या बाजुला नेऊन गाडीमधील 4 लाख 80 हजारांचा येवज लंपास केले.
चालकाच्या भ्रमनध्वनी ची नासधुस केली. घटना घडल्या नंतर तब्बल 2 तासांनी चालकाला शुद्ध आली असता त्यानी वाटसरूच्या भ्रमनध्वनी वरुन मालकाला कळवले असता व्यापाऱ्यांनी मालेगाव पोलीस चौकी येथे संपर्क केला. पोलीस निरीक्षक अशोक जाधव व पो.हे.काॅ.पप्पु चव्हान यांनी घटनास्थळी धाव घेतली. चालकाच्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस स्थानकात गु.र.क्र.0163/2022 कलम 380,34 नुसार गुन्हा दाखल करन्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी ग्रामीण पोलीस उप अधिक्षक अर्चना पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साईनाथ सुरवसे करत आहेत. मालेगाव परीसरातील गुन्ह्याचे वाढते प्रमाण पाहता मालेगाव चौकी ला कायम स्वरुपी चार चाकी वाहन देन्याची मागणी स्थानीकांमधुन होत आहे.