खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली विद्यार्थ्यांसोबत चाय पे चर्चा -NNL


नांदेड।
आज श्रीनगर भागातील प्रसिद्ध पोहे स्टाॅल व चहा स्टॉल भेटी देऊन खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी येथील विद्यार्थीशी चाय पे चर्चा केली. यामुळं विद्यार्थ्यांना आनंद झाला आहे.

आज श्रीनगर, विवेकनगर भागातील चहा व नाष्टा स्टाॅल ला भेठी देउन इथे याणारे विद्यार्थी याच्यांशी चर्चा केली, नांदेड मध्ये जवळपास पन्नास हजार विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने निट, जेईई व स्पर्धा परीक्षा देणारे हजारो विद्यार्थी आहेत, त्यांच्या समस्या त्यांनी जाणुन घेतल्या स्पर्धा परीक्षा साठी मैदान उपलब्ध करून देणे,तसेच राज्यातील व देशातील नावाजलेल्या अधिका-यांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करणे, अशा स्वरुपांच्या विद्यार्थ्यांनी मागण्या केल्या, नांदेड मध्ये देशभरातील अनेक राज्यांतील विद्यार्थी या ठिकाणी शिकायला आलेले आहेत, त्यांच्यीशी पण चर्चा झाली. लोकप्रतिनिधी म्हणुन पहिल्यांदाच असा प्रयोग केला, त्यामुळे विद्यार्थी मध्ये समाधान अढळुन आले.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने असे आनेक चाय पै चर्चा कार्यक्रम अनेक चौकात अयोजित करण्यात येणार आहेत, असे महानगर जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांनी सांगितले, आज श्रीनगर येथील कार्यक्रमाचे आयोजन मंडळ अध्यक्ष अशिष नेरलकर यानी केले आहे.


माझ्या सोबत प्रदेश चिटणिस मनोज पांगरकरजी, व प्रवक्ते सुनिल नेरलकर, मिलींद देशमुख, दिपकसिंह रावत, दिलीप ठाकुर, अशोक पाटील धनेगावकर, व्यकंट मोकले,  अनिल हजारी, संतोष क्षिरसागर, अरविंद भारतीया, संदिप क-हाळे, 
राज यादव, सुनिल भालेराव, रामराव पाष्टे, रमेश गटलेवार, कैलास पांढरे, बालाजी बोडखे, पांडुरग गोटे, तुषार सोनटक्के, प्रविण जोशी,भागवत कापसे आनंदा पावडे, शिवा नागरगोजे, अभिजित देशमुख, चंचलसिंघ जट, संतोष परळीकर, या़ंच्यासह  भाजपा पदाधिकारी व नागरीक, विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी