विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिश्रमाला कौतुकाची थाप मिळावी -NNL


किनवट, माधव सुर्यवंशी।
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिश्रमाला कौतुकाची थाप मिळावी व भावी आयुष्यातील ध्येयाची प्रेरणा मिळाली या उदात्त हेतूने भाजपा ओबीसी आघाडीचे शहराध्यक्ष शिवा क्यातमवार व त्यांच्या सुविद्य पत्नी नगरसेविका अनिता क्यातमवार यांनी प्रभाग 3 मधील विशेष प्राविण्यासह यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेटी देऊन स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला क्यातमवार दाम्पत्याच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे पालक वर्गातून कौतुक होत आहे

भाजपा ओबीसी आघाडीचे शहराध्यक्ष शिवा क्यातमवार हे दरवर्षीच आपल्या प्रभागातील गुणवंत विद्यार्थ्यां वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे गौरव करतात या वर्षी उच्च माध्यमिक परीक्षेत प्रभाग क्रमांक तीन मधील एकूण बावीस विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले यशस्वी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिश्रमाला  कौतुकाची थाप मिळावी व भावी आयुष्यात त्यांची प्रेरणा इतर विद्यार्थ्यांना मिळावे या उदात्त हेतूने  यावर्षी या प्रभागातील विशेष प्रावीण्यसह गुण संपादन केलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा  त्यांच्या घरी जाऊन स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देत गौरव व सत्कार केला. 

या प्रभागाच्या नगरसेविका अनिता क्यातमवार ह्या प्रभागातील विकास कामाबाबत नेहमीच दक्ष असतात  त्याचबरोबर प्रभागातील विद्यार्थ्याकडेही ते नियमितपणे लक्ष देऊन त्यांच्या शैक्षणिक अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करतात  असून या कार्याबद्दल शिवा क्यातमवार व त्यांच्या पत्नी नगरसेविका अनिता क्यातमवार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे या प्रसंगी..... सुरेश लोगमवार सर विकास जाधव संतोष म्याकलवार सचिन बंडेवार रोहित पताणीवार राजू गादेवार व्यंकटेश सिरमवार सौरभ क्यातमवार अरुण कोकुलवार राजू सिरमवार हे उपस्थित होते

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी