महावितरणच्या हिमायतनगरातील देयके देणाऱ्या ठेकेदारामुळे वीजग्राहकांना आर्थिक फटका -NNL

आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी ठेकेदाराचा मनमानी कारभार; 

नाव काळ्या यादीत टाकून ठेकेदाराचे कंत्राट रद्द करण्याची होतेय मागणी  


हिमायतनगर, अनिल मादसवार|
शहरातील वीज ग्राहकांना गेल्या दोन महिन्यापासून अव्वाच्या सव्वा वीज वापराचे देयके दिली जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत असून, हा सर्व प्रकार रिडींग घेणाऱ्या ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे होतो आहे. असा आरोप सर्वसामान्य नागरीकातून केला जात आहे. रिडींग घेताना आपल्याकडून झालेल्या चुका सुधारण्यासाठी अव्वाच्या सव्वा  देयके देणाऱ्या ठेकेदारांचा मनमानी कारभार थांबवून ठेकेदारचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी वीज ग्राहकातून केली जात आहे. 

हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, येथील वीज ग्राहक नेहमीच महावितरण विभागाला सहकार्य करणारा आहे. ज्या ज्या वेळी देयके वसुलीसाठी अधिकारी - कर्मचारी येतात त्यानं सहकार्य करून शासनाच्या तिजोरीत भर टाकण्याचे काम करणाऱ्या नागरिकांना म्हणवय तश्या सुविधा आणि वीजपुरवताहे मिळत नाही. त्यामुळे या भागातही शेतकरी नागरिकांना मोठ्या अडचणीसाना सामना करावा लागतो आहे. मात्र जे लोक देयके भरण्यास टाळाटाळ करतात त्यांना मात्र अभय दिले जाते हि बाब सर्वश्रुत आहे. गेल्या दोन वर्षपासून वीज ग्राहक कोरोनाच्या कचाट्यामुळे अडचणीत आलेले असताना देखील वेळेवर देयक भरून महावितरण कंपनीला घाट्यात येण्यापासून वाचवीत आले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत हिमायतनगर विभागाला नांदेड जिल्ह्यातून वसुलीमध्ये सर्व प्रथम येण्याचा सन्मान बहाल झालेला आहे.

असे असताना वीजदेयकासह सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी महावितरण आणि देयके बनविणाऱ्या ठेकेदारांचा हलगर्जीपणा अनेकदा उघड झाला आहे. असाच कांहींसा प्रकार सध्याच्या वीज वापराची देयके देणाऱ्या ठेकेदाराकडून झाल्याचे समोर आले आहे. मागील काही वर्षाच्या काळात ठेकेदाराने वीजग्राहकांना दिलेली देयक चुकीची रिडींग दाखऊन, वीज मीटर चालू असताना फाउलटी दाखवून अंदाजे देयके देण्याचा प्रकार केला आहे. यामुळे विजेचा अधिक वापर आणि वसुली कमी होत असल्याच्या चूक निदर्शनास आल्याचा फटका महावितरणला बसू लागल्याने वरिष्ठ अधिकाऱ्याकडून ठेकेदाराला खडे बोल सुनावण्यात आले होते. त्यामुळे ठेकेदाराने महावितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून वीज वापर कमी असताना देखील अनेक देयकांमध्ये अंदाजित आणि वाढीव देयके देऊन शाब्बासकी मिळविण्याची धडपड चालविली आहे. याचा नाहक फटका वीज ग्राहकांना बसत असल्याने आता वीज देयके देणाऱ्या ठेकेदारांच्या मनमानी कारभाराबद्दल सर्वसामान्य नागरीकातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

महावितरणच्या वीज वापराची देयके देण्याची टेंडर घेतलेल्या ठेकेदाराने सुरुवातीपासून नियमाप्रमाणे रिडींग घेणे आणि चुकीचीच माहितीतून देयके देण्याचा प्रकार केला नसला असता तर आज घडीला महावितरणला नुकसान झाले नसते. आणि वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा देयके भरण्याच्या आर्थिक फटका बसला नसता अशी संतापजनक प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. एव्हडेच नाहीतर दार महिन्याला वीज देयके बिल भरण्याच्या एक दिवस आगोदर म्हणजे उशिरा दिली जात असल्याने वीज ग्राहकांना अधिकचा भुर्दंड म्हणजे विलंब आकाराचा फटका देखील सहन करावा लागत आहे. यामुळे वीज ग्राहक मेटाकुटीला आला असून, अश्या प्रकार आपल्या कामाचा हलगर्जीपणा सर्वसामान्य वीज ग्राहकावर लोटून ठेकेदार आपला कारभार पारदर्शी असल्याचे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे दिसते आहे. अश्या प्रकारे महावितरण कंपनी आणि वीजग्राहकाच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या देयके बनविण्याचे काम करणाऱ्या ठेकेदारचे कंत्राट रद्द करून त्यांचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी अर्थी फटका बसलेल्या वीजग्राहकातून केली जात आहे. 

मार्च २०२२ महिन्याच्या वीज बीलांसोबत महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बील दिली होती. अगोदरच लोडशेडिंगमुळे ग्राहक वर्ग मेटाकुटीला असताना आता बिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्याचा शॉक दिल्यामुळे ग्राहक वर्गात नाराजी पसरली होती. तो फटका सहन केल्यानंतर आता महावितरणच्या ठेकेदाराने चक्क आपली चूक झाकण्यासाठी सर्वसामान्य ग्राहकांना अव्वाच्या सव्वा देण्याकडे देण्याचा प्रकार केल्याने वीज ग्राहकातून तीव्र संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. महावितरण कंपनीचे वेगवेगळे नियम आणि रिडींगमध्ये होणारे गोंधळ, सक्तीची वसुली यामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या महावितरणने आणखी ग्राहकांना जबरदस्त शॉक दिला असल्याची भावना व्यक्त होते आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी