ऑलिंपिक क्रीडा सप्ताहासाठी कायमस्वरूपी राखीव निधीची तरतूद करणार -महापौर सौ.जयश्री पावडे -NNL


नांदेड।
ऑलम्पिक असोशियन नांदेड नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने आयोजित ऑलम्पिक क्रीडा सप्ताहासाठी नांदेड महानगर पालिकेच्या बजेटमध्ये विशेष कायमस्वरूपी तरतूद करीत नांदेडच्या क्रीडा क्षेत्राला उभारी देण्याचे काम करणार असल्याचे मत महापौर जयश्री ताई पावडे यांनी मांडले.

त्या 29 जून रोजी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित ऑलिंपिक क्रीडा सप्ताहाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नांदेड ऑलम्पिक संघटनेचे अध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते रमेश पारे यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण सभापती अपर्णाताई नेरळकर जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार शिवछत्रपती पुरस्कार विजेते विभागीय ऑलिम्पिक सदस्य जनार्दन गुपिले सरदार अवतार सिंग रामगडीया, देसाई व शुभंकरोती फाउंडेशनचे किरण चौधरी ज्येष्ठ क्रीडा संघटक लड्डू सिंग महाजन  ,आनंद बोबडे  ,अर्जुन दमाम  ,गोविंद मुळे विक्रांत खेडकर , प्रलोभ कुलकर्णी  ,प्रणिता रेड्डी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू लता उंब्रेकर डॉ . दिनकर हंबर्डे  ऑलम्पीक संघटना सचिव बालाजी पाटील जोगदंड  ,कोषाध्यक्ष प्रा. जयपाल रेड्डी  , डॉ. राहुल वाघमारे  ,बाबुराव खंदारे रमण बैनवाड ,एकनाथ पाटील  ,प्रवीण कोंडेकर  ,संजय चव्हाण डॉ . राहुल वाघमारे  ,प्रशांत वावधाने शिवकांत देशमुख , बालाजी शेनेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती .


यावेळी बोलताना सभापती अपर्णा नेरळकर म्हणाले की क्रीडा क्षेत्रातूनच आयुष्याच्या यशाची वाट जाते त्यामुळे शहरातील सर्व मनपाच्या  शाळांना क्रीडा विकासासाठी प्रवृत्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले वयाची 75 ही गाठलेल्या व क्रीडा विकासासाठी विशेष योगदान दिलेल्या क्रीडा संघटक सरदार लड्डू सिंग महाजन यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला . उपस्थितासमोर  योगाच्या खेळाडूंनी प्रात्यक्षिक सादर केले. सप्ताहात घेण्यात आलेल्या तायक्वांदो  ,योगा  ,बुद्धिबळ , चित्रकला  ,सुदृढ भारत दौड हरित भारत ऑलम्पिक मॅरेथॉन  , सायकल रॅली , निबंध स्पर्धा  ,वकृत्व स्पर्धा , कराटे स्पर्धेतील विजेत्यांना  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऑलिम्पिक संघटना सचिव बालाजी पाटील जोगदंड यांनी केले तर अध्यक्षीय समारोप संघटना उपाध्यक्ष जनार्दन गोपीने आणि केला सूत्रसंचालन डॉक्टर राहुल वाघमारे व आभार प्रदर्शन डॉक्टर दिनकर हंबर्डे यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रभाकर पेठवडजकर  ,ऋषिकेश टाक , अतुल गोडबोले  ,दिनेश उमरेकर  ,आकाश भवरे, नितीन देडे, साईनाथ देशमाने, उत्तम सोनकांबळे, विशाल गायकवाड ,अभिषेक ओमप्रकाश आळणे , ज्ञानोबा नागरगोजे, मंगेश केंद्रे , शिवाजी केंद्रे , मालोजी कांबळे  ,राहुल लिंबोळे ,सुभाष धोंगडे  ,मोहन नायगावकर , विद्यानंद भालेराव  ,बालाजी उदाने , जगदीप वाघमारे  ,अमोल चौधरी  ,पृथ्वीराज चव्हाण  ,चंदू गव्हाणे यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी