चार गाव पाणीपुरवठा योजना अंतर्गत रस्ता रुंदीकरण नावाखाली तुटलेली पाईप लाईन तात्काळ जोडा,अन्यथा रास्तारोको -NNL

दोन जिल्हा परिषद सदस्य,चार गाव संरपचाचा ईशारा


नविन नांदेड।
विष्णुपुरी प्रकल्प अंतर्गत जिल्हा परिषद नांदेड कडुन चार गाव पाणीपुरवठा अंतर्गत करण्यात येणा-या पिण्याच्या पाईप लाईन गेल्या अनेक दिवसांपासून रस्ता रुंदीकरण नावाखाली  रस्ता खोदल्या मुळे तुटल्याने गावातील पाणी पुरवठा बंद झाला असून तात्काळ हा पाणी पुरवठा संबंधित के.टी.एल. कन्स्ट्रक्शन कंपनीने दुरुस्ती करून चालु न केल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे, मनोहर पाटील शिंदे , माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव गुंडले व चार गावाचा संरपच व ग्रामपंचायत सदस्य यांनी दिला आहे.

नागपूर ते तुळजापूर या महामार्गाचे रस्ता रुंदीकरण काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर लातुर फाटा सिडको येथे चालु असुन या ठिकाणी पुल उभारणी करण्यासाठी गेल्या दहा दिवसांपूर्वी रस्ता खोदल्या गेल्या आहे,या ठिकाणी विष्णुपुरी प्रकल्प येथुन जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत चार गाव पाणीपुरवठा अंतर्गत वाजेगाव, धनेगाव,बळीरामपुर,तुप्पा येथे पिण्याच्या पाण्याची मोठी लाईन टाकण्यात आली आहे,या गावांना या अगोदर विज देयक थकल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद होता तर वरीष्ठ अधिकारी यांना सांगुन पाणीपुरवठा सुरळीत होऊन दोन चदिवसाचा  कालावधी झाला होता.

 पंरतु रस्ता रुंदीकरण नावाखाली रस्ता खोदल्या मुळे पाणी पुरवठा लाईन के.टी.एल.कंपनी कडुन तुटल्या गेल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली व चार गावांना होणारा पाणीपुरवठा पुन्हा बंद झाला. या प्रकरणी संतप्त झालेल्या जिल्हा परिषद सदस्य व संरपच यांनी जिल्हा यांचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण व नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्याशी संपर्क साधला व माहिती दिल्यानंतर लातुर फाटा येथे येऊन  फुटलेली पाईप लाईन पाहणी केली.

यावेळी पडलेला मोठा खड्डा, साचलेले पाणी पाहणी,  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिनिधी तथा  माजी जिल्हा परिषद सदस्य आंंनद गुंडीले, युवा नेते राहुल हंबर्डे,जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे, मनोहर पाटील शिंदे,धनेगाव  ग्रामपंचायत संरपच गंगाधर ऊर्फ पिंटू पाटील शिंदे,बळीरामपुर ग्रामपंचायत संरपच अमोल गोडबोले, तुप्पा ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी  ज्ञानेशवर यन्नावार, चिमणाजी पाटील कदम,मंहमद रफी भाई यांच्या सह ग्रामस्थ यांनी केले.

 चार गाव पाणीपुरवठा अंतर्गत पाईप लाईन जोडुन तात्काळ पाणीपुरवठा चालु न केल्यास  रस्ता रोको करण्याचा इशारा यावेळी ऊपसिथीत लोकप्रतिनिधी यांनी दिला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी