शिवणी, प्रकाश कार्लेवाड। किनवट तालुक्यातील तेलंगाणा सीमेवर असलेल्या अप्पारावपेठ ग्रांमपचायतीच्या सरपंचपदी शेख.अब्दुल रब यांची दि.१० जुन रोजी निवड झाली.असुन येथील ग्रामपंचायती वर माजी मंत्री डि.बी.पाटील यांचे वर्चस्व आहे.असे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.तर तात्कालीन सरपंच यांना अतिक्रमण भोवले असुन पदावरुन पायउतार व्हावे लागले आहे.
अप्पारावपेठ येथील तात्कालीन सरपंचाने शासकिय जागेवर अतिक्रमण केल्याने अप्पारावपेठ येथील एका नागरिकांने तक्रार केल्याने प्रशासनाच्या माध्यमातुन याबाबत चौकशी होवुन तात्कालीन सरपंचाच्या विरुध्द कारवाई झाल्याने पायउतार व्हावे लागले.
यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर पुन्हा अप्पारावपेठ ग्रामपंचायतीवर सरपंच पदावर कोण विराजमान होईल ? या कडे परिसरातील सर्वच राजकीय मंडळींचे लक्ष लागले होते.तर अखेर दि.१० जुन रोजी सरपंच पदाची निवड झाली असुन यावेळी अप्पारावपेठ येथील ग्रा.पं सदस्यांच्या उपस्थितीत ही निवड प्रकिया पार पडली तर पाच विरुद्ध तीन अशा मतदानाच्या अंकाने माजी मंत्री डी.बी.पाटील यांचे समर्थक शेख.अब्दुल रब यांची सरपंच पदी निवड करण्यात आले.
यावेळी अध्यासी अधिकारी म्हणुन मोहम्मद रफिक महम्मद बशीरोदीन,तलाठी अविनाश करंदीकर,ग्रामसेवक एस.एल.पपुलवाड यांनी काम पाहीले. या निवडी बाबत माजी मंत्री तथा माजी खा.डि.बी.पाटील, माजी जि.प.सदस्य तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुर्यकांत आरंडकर,भाजपा जिल्हा सचिव काशिनाथ शिंदे, ग्रा.पं सदस्य पुष्पाबाई मुतुल,गंगुबाई मरपेदेलु,इरना कौड,निखील धुर्वे, तंटामुक्त अध्यक्ष विनायकराव देशमुख,माजी सरपंच भुमेश किनी, भुपतीरेड्डी,पो.पाटील भुमारेडी् अष्टप लिंगया,शेख मोईन,प्रदिप सावते,शेख फारुखभाई,भोजारेड्डी मुतुल,माजी सरपंच श्रीधर रेड्डी,रामकिशन आरंडकर,सतिश सोंडारे,नरेश कौड,राजु पाटील ,दतु पाटील अमलापुर यांच्या सह अनेकांनी नवनिर्वाचीत सरपंच शेख अब्दुल रब यांच्या निवडी बाबत अभिनंदन केले आहे.
तर निवडी बाबत कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन ईस्लापुर पोलीस ठाण्याचे सपोनि रघुनाथ शेवाळे,पोउनि भारत सावंत,सपोउनि निवळे पाटील,पोलीस अमलदार केंद्रे देशमुख,चव्हाण, यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .
सच को आंच नही झूट को पैर नही-नवनिर्वाचित सरपंच शेख अब्दुल रब तेलंगाणा सिमेवर असलेल्या किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ येथील ग्रामपंचायत चे नवनिर्वाचीत सरपंच यांनी निवडी दरम्यान असे सांगीतले कि,मागील पंधरा महिन्यापासून गावच्या ग्रामपंचायच्या राजकारणात जे घडले ते आत्यंत चुकीचे होते. तर अखेर आज सर्वांच्या सहकार्याने सत्याचा विजय झाला आणि वरिष्ठांच्या आशीर्वादाने व सहकाऱ्यांच्या सहकार्यमुळे माजी सरपंच पदावर निवड झाली.तर पुन्हा एकदा सच को आंच नही झूट को पैर नही याची प्रचिती प्रत्यक्ष पहावयास मिळाली. तर आगामी काळात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन सदैव सेवक म्हणून कटीबद्ध असून माननीय माजी मंत्री डि.बी. पाटील,हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील, किनवट माहूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार भिमराव केराम,माजी जि.प.सदस्य सुर्यकांत आरंडकर यांच्या माध्यमातुन गावाचा विकास करणार असल्याचे नवनिर्वाचीत सरपंच शेख अब्दुल रब यांनी नांदेड न्युज लाईव्ह शी बोलतांना सांगीतले.तर निवडी दरम्यान ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे नवनिर्वाचित सरपंच शेख अब्दुल रब यांनी आभार मानले.