नांदेड| आझादी का अमृत महोत्सवातर्गंत राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या निर्देशानुसार प्रतिष्ठित आठवडा नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा अग्रणी बँक नांदेड तसेच जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत, खाजगी, क्षेत्रीय ग्रामीण बँक यांनी केले.
या कार्यक्रमास खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी एसबीआय बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक नविनकुमार उप्पलवार, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक गणेश कुलकर्णी, शिवकुमार झा, ए जी एम, नाबार्डचे डीडीएम दिलीप दमाय्यावर, डीडीएम नाबार्डचे जीएम डीआयसी प्रवीण खडके, सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक व योजनांचे पात्र लाभार्थी यांची उपस्थिती होती. या सर्व लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीस प्रोत्साहन देणे हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश कवडेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी लाभार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून बँकाच्या योजना तसेच परतफेडीबद्दल माहिती देऊन होणारे फायदे दर्शवले. यावेळी लाभार्थ्यांसोबत बँक सेवा पुरवण्यात उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी, ग्राहक सेवा केंद्रचालक व इतर कर्मचाऱ्यांचा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी कर्जाच्या परतफेडीचे महत्त्व उपस्थित लाभार्थ्यांना पटवून दिले.