डावी लोकशाही आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीणीशी लढणार -NNL

(नांदेड येथे झालेल्या बैठकीत झाला एकमताने निर्णय)


नांदेड|
दिनांक १४ जून रोजी चिखलवाडी परिसरातील कार्यालयामध्ये डॉ.पी. डी. जोशी - पाटोदेकर यांच्या अध्येक्षत्येखाली डावी लोकशाही आघाडीची बैठक घेण्यात आली.

त्या बैठकीस डावीलोकशाही आघाडीतील तीन घटक पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.ते म्हणजे जनता दल (सेक्युलर) भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आदी पक्षानी आपला सहभाग नोंदविला आहे.नांदेड जिल्ह्याचे निमंत्रक तथा भाकपचे जिल्हा सचिव ऍड.कॉ. प्रदीप नागपूरकर, माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ.विजय गाभणे, जिल्हा कमिटी सदस्य कॉ.गंगाधर गायकवाड, जदसे चे जिल्हा महासचिव सूर्यकांत वाणी, कॉ.शिवाजी फुलवळे, कॉ.जयराज गायकवाड,कॉ.एन. टी.कांबळे आदींची उपस्थिती होती.

लवकरच होऊघातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अर्थातच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व इतर निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी महत्त्वाची बैठक बोलविण्यात आली होती. त्या बैठकीमध्ये आगामी निवडणुका पूर्ण ताकदिनीशी लढण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. पुढील बैठक पुढच्या आठवड्यात घेण्यात येणार असून डावी लोकशाही आघाडीतील घटक पक्षांनी आपापल्या पक्षाच्या वतीने लढविण्यात येणाऱ्या गट,गण आणि वॉर्ड निहाय माहिती सादर करण्याचे निश्चित झाले आहे.

जिल्ह्यात काही ठिकाणी डाव्या आघाडीच्या उमेदवारांचा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत फार कमी मतांनी पराभव झाला असून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. त्या जागा निश्चितपणे जिंकून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहात खाते उघडण्याच्या दृष्टीने डाव्या लोकशाही आघाडीचे सर्व पुढारी कार्यकर्ते व उमेदवार कामाला लागले असून होऊ घातलेल्या निवडणुकी सर्व ताकदीनिशी लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी