वृक्षाचा वाढदिवस राजकारणात प्रथमच पाहिला व केलाही, खा.प्रताप पाटील चिखलीकर-NNL


नविन नांदेड।
वृक्षांचा वाढदिवस प्रथमच मोठ्या प्रमाणात केक कापून साजरा करण्याचा प्रंसग प्रथमच बघितला ,राजकारणात प्रथमच हा योग आल्याचे सांगुन पाच हजार वृक्ष लागवड व संगोपन मोहन पाटील घोगरे यांनी केल्या बद्दल अभिनंदन करून प्रंशसा केली.

 श्री.दतकृपा बहुउद्देशीय सेवा भावी संस्था हडको नविन नांदेड चा वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दतकृपा मंगल कार्यालय परिसरातील वृक्षाचा वाढदिवस खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व वृक्षमित्र मोहनराव घोगरे  पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत ५ जुंन रोजी केक कापून सहावा वाढदिवस साजरा केला यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी माजी वन,व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड करुन  नावलौकिक केले, नवीमुंबई महापालिकाने वृक्ष लागवड करून परिसर वृक्षमय करून हिरवागार केला आहे  त्या पध्दतीने जिल्ह्यात ही वृक्ष लागवड करावी असे आवाहन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले.  

 दतकृपा बह ऊधदेशीय सेवा भावी संस्था अंतर्गत दतकृपा मंगल कार्यालय हडको यांच्या वतीने  येथील परिसरात लावण्यात आलेल्या वृक्षाच्या वाढदिवस जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दतकृपा सेवाभावी संस्था हडको यांच्या वतीने करण्यात येत असतो ,या वर्षी ही हा ऊपकम आयोजित करण्यात आला होता, यावेळी ७५ वृक्षाचा लागवड करून संगोपण केलेल्या वृक्षाचा सहावा वाढदिवस केक कापून  नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

 यावेळी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी,भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष संजय पाटील घोगरे,  जगदेराव घोगरे,भाजपा मंडळ सिडको अध्यक्ष वैजनाथ देशमुख,  पोलीस पाटील संघटनेचे मारोतराव पाटील बामणीकर,  भाजयुमो प्रांत सरचिटणीस अनिल पाटील बोरगांवकर ,वृक्ष मित्र फाऊंडेशनचे संतोष मुगटकर, केशव पवार,गणेश साखरे, शैलेंद्र क्षिरसागर,सुधाकर चेरकुला, प्रल्हाद घोरबांड,प्रीतम भराडीया, भाजपा पक्ष पक्षप्रवकते जनार्दन ठाकूर, सरचिटणीस संतोष वर्मा,  जनार्दन गुपीले,दिंगबर मुंडकर, सुभाष शेटे, निवृत्ती रणबावे, डॉ.शंकर स्वामी, लालाजी पाटील ,विठ्ठल पाटील,आबाजी घोगरे, अनसाजी घोगरे, गिरीश डहाळे, धिरज स्वामी, महेद्र तरटे, सिध्दार्थ धुतराज, साईबाबा मंदिर, दत मंदिर ,दतकृपा भजनी महिला मंडळ हडको यांच्या सह मान्यवरांच्यी ऊपसिथी होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डि.गा.पाटील यांनी तर प्रास्ताविक मध्ये  मोहन पाटील घोगरे  यांनी ,या वेळी ५२२१ वृक्षाची लागवड व संगोपन केले असल्याचे सांगून  प्रत्येक व्यक्ती ने एक वृक्ष तर लागवड करावी असे आवाहन केले. यावेळी मिराताई मनोज कोटलवार यांनी पर्यावरण दिनानिमित्त महत्व आपल्या भाषणातून व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोविंद घोगरे, संजय मोरे, बालाजी घोगरे, नामदेव घोगरे, भागवत तिडके,आनेष घोगरे, मुन्ना शिंदे, यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी