नांदेड| महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती (उमेद) अभियानांतर्गत स्वयं सहायता समूहांना विविध बँकेद्वारे बँक पत पुरवठा करुन देण्यात येतो. राज्य व जिल्हास्तरावर प्रत्येक बँक शाखेला उद्दिष्ट देण्यात येते.
हे उद्दिष्ट साध्य व्हावे व बँक व्यवस्थापकांचे सहकार्य प्राप्त होण्यासाठी सोमवार 13 जून 2022 रोजी सकाळी 11 ते सायं. 5 या वेळेत बँक व्यवस्थापकांचे एक दिवशीय प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनाच्या सभागृहात आयोजित केले आहे. या प्रशिक्षणास जिल्ह्यातील सर्व बँक व्यवस्थापकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर- घुगे यांनी केले आहे.
जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन पातेवार, जिल्हा अभियान व्यवस्थापक माधव भिसे, प्रशिक्षक दीक्षित सर यांचे या कार्यशाळेत मार्गदर्शन होणार आहे.