नविन नांदेड| नरोबा मंदिर देवस्थान जुना कौठा, नांदेड येथे ८ ते १५ मे दरम्यान नरसिंह जयंती निमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे समारोप १५ मे रोजी हभप परमेश्वर कंधारकर यांच्ये काल्याचे किर्तन व देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे यांच्या कडुन महाप्रसादाने करण्यात आले आहे.
अखंड हारिनाम सप्ताह निमित्ताने काकड आरती, अभिषेक, पारायण, गाथा भजन, हरिपाठ व हरी कीर्तन होईल.सप्ताहा मध्यें ह.भ.प. पंढरी महाराज मुरकुटे, मधुसूदन महाराज कापसीकर, -शंकर महाराज लोंढे, अशोक महाराज आळंदीकर,परमेश्वर गुरुजी कंधारकर ,-एकनाथ महाराज हरसदकर ,कृष्णा महाराज पंढरपुर यांच्ये किर्तन होणार असुन १५ मे रोजी नृसिंह जयंती निमित्ताने दुपारी १२ वाजता काल्याचे कीर्तनानंतर महाप्रसादाने अखंड हारिनाम सप्ताह सांगता करण्यात आली.
अंखड हरिनाम सप्ताह व दैनंदिन धार्मिक यशस्वी करण्यासाठी नरोबा मंदिर अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे ,मंदिर संस्थानचे पदाधिकारी निळकंठ काळे पाटील, बालाजी मामा देऊळगावकर , नागनाथ बोडके, पंकज मंठाळकर, अंकुश जाधव, माधवराव शेळगावकर, आंनदा धोंडगे, गोविंद पुरभूज , बालाजी कटमवार, बालाजी कोल्हे,व पुजारी व्यंकटेश गुरू, देविदास डुबुकवाड व पदाधिकारी भाविक भक्तांनी परिश्रम केले आहे.