लोहा। जिल्ह्यात सगळीकडेच ४०अंशी सेल्शिअस पेक्षा अधिकचे तापमान आहे त्यामुळे या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी शक्यतो दुपारी १२तर सांयकाळी ४ वाजेपर्यंत घरा बाहेर पडू नये पाणी भरपूर प्यावे ,रुमाल टोपी, गॉगल वापरावा शक्यतो शीतपेये चहा कॉपी टाळावे असे आवाहन प्रसिद्ध हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ डॉ राहुल घंटे यांनी केले आहे.
लोह्याचे भूमिपुत्र डॉ राहुल घंटे यांनीं वाढते तापमाना बद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आवाहन केले आहे सोशल मोडिया तसेच पत्रकाद्वारे लोकांना माहिती करून देत आहेत आपल्या गावातील व परिसरातील तापमान सतत 40 सेल्सियस पेक्षा जास्त रहात असल्याने उष्माघात /हीट स्ट्रोक चे रुग्ण वाढत आहेत.
तरी सर्व नागरिकांना विनंती आहे आपण उष्माघात टाळण्यासाठी .दुपारी 12 ते 4 या वेळेत घराच्या बाहेर जाणे टाळावे.घरा बाहेर निघण्या पूर्वी भरपूर पाणी प्या.टोपी, रुमाल, छत्री, गॉगल याचा वापर करावे .हलके सुती व सैल कपड़े परिधान करा.
ताक, सरबत, पाणी भरपूर प्रमाणात सेवन करावेत .घरातील वृद्ध व बालके यांची विशेष काळजी घ्यावी.चहा, कॉफी, शीतपेय/कोल्ड ड्रिंक , मद्य यांचे सेवन टाळावे.त्या सोबतच त्यांनी पाळीव प्राण्यांना सावली द्या व भरपूर पाणी पाजा असे आवाहन
जीवन ज्योत "चे डॉ राहुल घंटे यांनी केले आहे.