विज वितरण कंपनिचे कर्मचारी नाॅट रिचेबल ...
मुखेड, रणजित जामखेडकर| मुखेड तालुक्यातील मौजे केरूर येथील मागील ४ विजपुरवठा खंडीत झाल्याने गावात तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पाण्यासाठी ३ किलोमीटर भटकंती करून पाण्याच्या शोधात आपले गुरे - ढोरे घेऊन जाऊन आपली तहान भागवावी लागत आहे.
गावातील विजपुरवठा खंडीत झाल्याने गावातील महिला, बालक, वयोवृद्ध नागरिकांना आपले सर्व कामे सोडुन पाण्यात शोधात भटकंती करावी लागते यामुळे गावातील जनजिवन विस्कळीत झाले आहे. वीज गुल झाल्याने भर उन्हाळ्यात नागरिकांना रात्र जागुण काढावी लागत आहे.
या गंभीर प्रश्नांकडे विद्युत प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन केरुर येथील विजपुरवठा तात्काळ सुरळीत करावा अन्यथा अशी मागणी केरूर येथील ग्रा.प सदस्य सतिष पा. शिंदे, गिरीधर पा. शिंदे, हाणमंतराव पा.शिंदे, शिवाजी पा. शिंदे, जयशींग डुमणे,नरसींग पांचाळ, भाऊसाहेब पा.शिंद, गोविंद पा.शिंदे, केरबा पा.शिंदे, शंकर पा.शिंदे, बालाजी पा.शिंदे,यशवंत पा.नरवाडे यांच्या सह गावातील नागरिकांनी केली आहे.