किनवट, माधव सुर्यवंशी| राज्यातील नगर परिषद कर्मचारी मागील दोन महिण्यापासुन विविध स्वरुपाचे साखळी आंदोलन करत असुन त्यांच्या विविध मागण्या ज्यामध्ये ७ वा वेतन आयोग , राज्यातील विविध ठीकाणच्या नगर परिषदा व महानगर पालिकांच्या कर्मचा-यांचे प्रलंबित प्रश्न तथा अशा एकुण २६ मागण्यांना घेऊन राज्यातील नगर परिषद कर्मचारी आंदोलन करत आहे. याच अणुषंगाने किनवट नगर परिषदेचे कर्मचारी देखिल १ मे ध्वजारोहना नंतर बेमुदत काम बंद आंदोलनात समाविष्ठ झाले असुन अशा स्वरुपाचे आंदोलन राज्यव्यापी आहे.
महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटना शाखा किनवट व्दारे मुख्याधिकारी नगर परिषद किनवट यांना दिनांक २९ एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनाव्दारे विविध संदर्भीय विषयान्वये कळवण्यात आले आहे कि, दिनांक १ मे ध्वजारोहना नंतर बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहे. तरी या अणुषंगाने १ मे महाराष्ट्र दिना पासुन कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन सुरु केले असुन नगर परिषदेच्या प्रांगणा समोर तंबुमध्ये बसले आहेत.
यावेळी माध्यमांशी बोलतांना कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष किरण कलगोटुवार यांनी सांगितले कि, आम्ही राज्यातील आमच्या संघटने सोबत असुन मुंबई येथे २० एप्रिल रोजी संपन्न झालेल्या आझाद मैदान ते मंत्रालय या मोर्चामध्ये देखिल सहभागी झालो होतो. आमचा निर्धार ठाम असुन राज्य सरकारने या संदर्भात लवकरात लवकर तोडगा काढुन आम्हाला आश्वस्त करावे.
यावेळी चंद्रकांत दुधारे, स. अझहर अली, व्यंकट शिवनकर, अल्ताफ गफुर, सुरेश पुरुडवार, शेख रियाझ, संगिता सिरमलवार, रमेश नेम्मानिवार, प्रशांग कुमरे, राजु पिल्लेवार, तौफिक खान, अतिक भाई, संदिप ढंडोरे यांच्यासह इतर हि नगर परिषद कर्मचारी आंदोलना मध्ये सहभागी झाले आहे.