परमेश्वर भोयर यांच्या मृत्यूचा तपास जलद गतीने करा-नातेवाईकाची पोलीस अधीक्षकांकडे मागणी -NNL

तात्काळ तपास लावावा नाहीतर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा  

नांदेड/हिमायतनगर|
युवा कार्यकर्ता परमेश्वर बाबूराव भोयर यांचा दि.२१ में रोजी संशयास्पद मृत्यू झाला. रात्री उशिरा मयताच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त करत हिमायतनगर पोलिसांना तक्रार देऊन तपास करण्याची मागणी केली. घटनेस ६ दिवस उलटले मात्र पोलिसांचा तपास शून्य आहे. त्यामुळे मयताचे मित्रमंडळी व नातेवाईकांनी दि.२६ रोजी पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांची भेट घेऊन तपास जलद गतीने लावण्यात यावा.  आरोपीना तत्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाचा अवलंब केला जाईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. 

देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, हिमायतनगर शहरासह तालुक्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात बोकाळली आहे. गेल्या सहा महिन्यापासून खून, दरोडे, चोऱ्या, लूटमार आदी प्रकार वाढले आहे. त्यात शहरात ३ खुनाच्या घटना घडल्या असून, तालुक्यात ७ खून झाले आहेत. मात्र आत्तापर्यंत एकही घटनेचा पूर्णतः तपास लावण्यात पोलीस अधिकारी व त्यांची टीम अपयशी ठरली आहे. काँग्रेस पक्षाचा सामाजिक कार्यकर्ता परमेश्वर बाबूंराव भोयर यांचा मृतदेश दि.२१ रोजी एका चेंबरमध्ये आढळून आला. हि घटना आकस्मिक नसून घातपात तथा जाणीवपूर्वक खून करून पुरावा नष्ठ करण्याच्या उद्देशाने शहरातील मुख्य कमानीजवळील बालाजी ट्रेडर्स यांच्या दुकानाच्या पाठीमागील चेंबरमध्ये टाकण्यात आला असल्याचा संशय नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे.

मयत परमेश्वर भोयर हे दि.२० रोजी लग्नसोहळ्याला जातो म्हणून घरातून गेले होते. रात्रीला ते घरी परत आले नाहीत, त्यामुळे घरच्यांनी सर्वत्र शोधाशोध केली मात्र त्यांचा कुठेच ठावठिकाणा लागला नाही. आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेश संशयास्पद अवस्थेत आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली, मयत परमेश्वर भोयर यांच्या अचानक अश्या अवस्थे मृतदेह आढळून आल्याने त्यांच्या मित्रमंडळासह नातेवाईकांनी हा आकस्मिक मृत्यू नसून खुनाचा प्रकार आहे असा संशय व्यक्त केला. याबाबत हिमायतनगर पोलिसांना निवेदन देऊन घटनेचा पारदर्शक पद्धतीने तपास लावून यास कारणीभूत असलेल्या आरोपीना अटक करण्यात यावी अशी मागणी केली होती.


मात्र पोलिसांचा तपास संत गतीने आणि हवा तश्या पद्धतीने होत नल्याने लक्षात आल्यावर दि.२६ में रोजी नातेवाईक, मित्रमंडळींनी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांची भेट घेतली. आणि या घटनेचा वृत्तांत कथन करून तत्काळ तपास लावून तातडीने मारेकऱ्यास अटक करावी अशी मागणी केली आहे. तसेच या घटनेच्या पारदर्शक तपासासाठी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नेमणूक करावी. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रति महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री अशोकराव चव्हाण, खासदार हेमंत पाटील, आ.माधवराव पाटील जवळगावकर याना पाठविले आहे.

अन्यथा हिमायतनगर तालुका बंदची हाक देण्यात येईल - युवा कार्यकर्ता परमेश्वर भोयर यांच्या खुनाच्या तपास पोलिसांकडून चुकीच्या दिशेने होत असल्याने दिनांक 26/05/2022रोजी गुरुवारी हिमायतनगर तालुका बंदची हाक देण्यात आली होती. मात्र पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या कार्यालयाकडे या संदर्भात वेळ मिळाल्यामुळे हा बंद रद्द करण्यात आला. असे असले तरी तातडीने स्वर्गीय परमेश्वर भोयर यांच्या खुनाचा तपास येत्या एक-दोन दिवसात लावण्यासाठी योग्य चौकशी झाली नाहीतर पुन्हा हिमायतनगर तालुका बंदची हाक देण्यात येईल अशी माहिती परमेश्वर भोयर यांच्या मित्रमंडळाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.  

आजी-माजी आमदारांनी केले भोयर कुटुंबीयांचा सांत्वन - युवा कार्यकर्ता परमेश्वर भोयर यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर आणि माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी भोयर कुटुंबियांचे भेट घेऊन सांत्वन केले. तसेच या घटनेचा तपास पारदर्शक व्हावा यासाठी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन तपासाला गती देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन दिले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी