वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने छत्री वाटप -NNL


नविन नांदेड।
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड दक्षिण च्या वतीने  उन्हाळ्यात उन्हापासून बचाव करण्यासाठी  फळविक्रेते व बुट पालीश करणा-या छत्रीचे वाटप करण्यात आले.

वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने समाजापासून दुर्लक्षित असलेल्या रमामाता आंबेडकर चौक, गुरुवार बाजार, पाण्याची टाकी, हाडको बसस्टॉप येथील बूट पॉलिश व चप्पल शिवण कामगारांना उन्हापासून बचाव करण्यासाठी छत्रीचे वाटप करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडी दक्षिण महानगराध्यक्ष विठ्ठल दादा गायकवाड, महासचिव अमृत नरंगलकर, साहेबराव भंडारे, युवा आघाडीचे सुदर्शन कांचनगिरे, श्याम नायगावे, वैभव लष्करे, संजय निळॆकर, श्याम कांबळे,आदर्श कांबळे, सचिन कांबळे, अरुण पोवळे, यशस पोवळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन युवा आघाडी दक्षिण महानगराध्यक्ष गोपाल सिंग टाक व महासचिव शुद्धोधन कापसीकर यांच्या वतीने करण्यात आले होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी