नांदेड| नांदेड जिल्हा पेन्शनर असोसिएशनची सर्वसाधारण सभा २९मे रोजी हनुमान मंदिर सभागृह विजय नगर नांदेड येथे सकाळी साडे दहा वाजता आयोजित करण्यात आली आहे. त्याबैठकीस निवृत्तीधारकांच्या अडीअडचणी वर चर्चा होणार आहे अशी माहिती जिल्हा पेंशनर असोसिएशनचे अध्यक्ष इंजि.द.मा.रेड्डी, सचिव ऍड चंद्रकांत जटाळ यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
जिल्हा पेन्शनर असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकूर-घुगे, मुख्य लेखा वित अधिकारी शिवप्रकाश चना, जिल्हा कोषागार अधिकारी अभय चौधरी, उपमुख्य लेखा व वित अधिकारी शेखर कुळकर्णी, अप्पर कोषागार श्री पांडे, शिक्षणाधिकारी (प्रा) सविता बिरगे यांची उपस्थिती राहणार आहेत.
२९ मे रविवारी सकाळी साडे दहा वाजता विजय नगर नांदेड येथे ही सभा होणार आहे. यावेळी पेन्शनर यांच्या अडीअडचणी, प्रलंबित प्रश्न यावर सविस्तर चर्चा होणार आहे. जिल्हा पेन्शनरचे अध्यक्ष इंजि.द.मा रेड्डी, उपाध्यक्ष म.मिराखान, सचिव चंद्रकांत जटाळ, सहसचिव एन जी कोकाटे, कोषाध्यक्ष सु,ग. चौधरी, संभाजी शिंदे, सुभाष कुरुडे, माधव निवघेकर यांनी या जिल्हा पेन्शनर सभेसाठी उपस्थितीत रहाण्याचे आवाहन केले आहे.