नांदेड| स्पर्धेच्या काळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक- पालक व विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद असणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ.सौ. एस.एन. राऊत यांनी अध्यक्षीय समारोप करताना केल्या.
महाराष्ट्र दिनानिमित्त दीपकनगर येथील श्रीनिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षक-पालक, विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात अध्यक्षीय समारोप करतांना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सहसचिव तथा श्रीनिकेतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.सौ.एस.एन. राऊत तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ महिला पालक सौ.शांताबाई रगडे,श्रीनिकेतन हायस्कूल चे मुख्याध्यापक यशवंत थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात सर्वप्रथम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादनानंतर ध्वजारोहण करण्यात आले.
पुढे बोलताना डॉ. सौ राऊत म्हणाल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत पालकांचा फार मोठा वाटा आहे.आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालकांनी शाळेतील शिक्षकांशी सातत्याने संवाद ठेवून आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख तपासण्याचे आव्हान डॉ.सौ.राऊत यांनी केल्या. कार्यक्रमात शाळापूर्व तयारी म्हणून दीपकनगर व शाळापरिसरात विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्याबाबत विनंती करण्यात आली व तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक,विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ.निता जगधने, सौ.कांचन सोनकांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहशिक्षक प्रल्हाद आयनेले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक अविनाश इंगोले, प्रल्हाद आयनेले, श्रीधर पवार, सौ.सुरेखा मरशिवणे, बाळकृष्ण राठोड,सुदर्शन कल्याणकर, गतिस मगरे, मोगल, दंडेकर, बनसरे, व्हनशेट्टे, सौ प्रतिभा मोरताडकर, बुद्धांगणा गोखले,उर्मिला सोनवणे, राठोड,माळेगावे, कळकेकर आदींनी परिश्रम घेतले.