नायगाव, दिगंबर मुदखेडे| कै.दाजीराव माधवराव पोलीस पाटील शिंपाळे खैरगावकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त खैरगाव येथे आज दि. 5 मे रोज गुरुवारी रात्री ठीक 8:30 ते 11:30 वाजता सुप्रसिद्ध किर्तनकार भागवताचार्य ह.भ.प. चंद्रकांत महाराज लाठीकर यांच्या नामसंकीर्तनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सह शिक्षक शंकर दाजीराव पा शिंपाळे यांनी दिली आहे.
दाजीराव पाटील हे परिसरातील शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून सर्व परिचित होते कोरोनाच्या संकटाने शिंपाळे परिवार अचानकपणे आघात झाला व त्यांचे गत वर्षी निधन झाले. पाहता पाहता या घटनेची वर्षपूर्ती ही होत आहे. पण खैरगावकर व शिंपाळे कुटुंबीय अजूनही त्यांच्या आठवणीत चिर आहेत.
त्यांच्या पुण्यस्मरणा निमित्ताने त्यांच्या कार्यास मायेची झालर व उजाळा मिळावा या हेतूने आज रोजी चंद्रकांत महाराज लाठीकर यांच्या नामसंकीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या हरिकीर्तन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आव्हान शिंपाळे पाटील परिवार व समस्त खैरगावकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.