नांदेड। येथील विसावा उद्यान व उत्सव मेला या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून महिला व मुलींची छेडछाड प्रकरण वाढलेले आहेत. काही टवाळकी करणारे मुले या ठिकाणी फक्त छेडछाड करण्याच्या उद्देशाने फिरत असतात. अशा या टवाळकी करणाऱ्याना मुलींची व महिलांची छेडछाड करण्यापासून रोखण्यासाठी दामिनी पथक स्थापना करून गुन्हेगारास कायदेशीर कार्यवाही व्हावी अशी विहिप बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली आहे.
टवाळकी करणाऱ्याना मुलींची व महिलांची छेडछाड करण्यापासून रोखण्यासाठी विसावा उद्यान व उत्सव मेळ्याच्या ठिकाणी दामिनी पथक नेमण्यात यावे यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले. तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे सर्व पालकांना विनंती करण्यात येते की विसावा उद्यान व उत्सव मेला या ठिकाणी आपल्या पाल्यांना एकटे न जाऊ देता आपण त्यांच्यासोबत जावे.
हे निवेदन देताना जिल्हा मंत्री शशिकांत पाटील, महानगर मंत्री गणेश कोकुलवार, विभाग सहसंयोजक गणेश यशवंतकर, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक महेश देबडवार, शुभम ठाकूर,अनिकेत सिंह परदेशी, सुमेर ठाकूर,मोहन बैस,प्रवीण कुमार पेंटा,राजू जांगडे, सोमेश बोनाकुडतेवार, बजरंग भोसले उपस्थित होते.