नांदेड जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग बांधव हक्कांसाठी पनवेल एक्स्प्रेसने आयुक्त कार्यालय पुणे आंदोलनासाठी रवाना -NNL


नांदेड।
जिल्यातील दिव्यांगाना त्यांचे हक्क मिळावा म्हणून दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हातील सर्व तहसिलदार व गटविकास अधिकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, समाजकल्याण अधिकारी, दिवृयांग तक्रार निवारण कक्ष,यांना प्रत्यक्ष दि,१५ फ्रेबु २२ ते 11 मे २२ पर्यंत शिष्टमंडळाने निवेदनावर चर्चा करून मुध्दत देऊन सुध्दा न्याय हक्क मिळालाच नाहि साधे  प्रश्नाचे उतर मिळाले नसल्यामुळे

कुंभकर्ण झोपेत असलेल्या लोकप्रतिनिधी, प्रशासन जागे होत नसल्याने दिव्यांग जनता दल सामाजिक स़गटना व दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र यांच्या संयुक्तपणे स़स्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कु़चेलिकर, कुलकर्णी  काका,ज्ञानेश्वर नवले, यांच्या नेतृत्वाखाली अशा कडक उन्हात दिव्यांग आयुक्त कार्यालय पुणे येथे दिव्यांगाच्या  प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी दि 17 मे 2022 रोजी सकाळी 11 ते 5 पर्यत अर्ध नग्न बोम मारो धरने आंदोलन करण्यासाठी मा, मुख्यमंत्री व संबधित मंत्रीमहोदय यांना मार्फत मा दिव्यांग आयुक्त साहेब पुणे यांच्या तर्फे खालील मांगन्या संदर्भात निवेदन देऊन लक्ष केंद्रित करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग पुण्याकडे रवाना झाले.

 दिव्यांग आयुक्त साहेब तरी दिनदुबळ्याकडे लक्ष देतील काय दिव्यांख हक्क कायद्यानुसार न्याय मिळेल काय?  कायदा करून शासन अनेक निर्णय काढुन प्रशासकिय स्थरावर  अंमल  बजावणी व्हावी म्हणून  ग्रामपंचायत स्थरावर दिव्यांगाच्या ग्रामसभा घेऊन कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश पारित करावे. २) दिव्यांगाना सर्व सामान्य जनतेसारखे जीवन जगता यावे व  स्वबळावर व्यवसाय करण्यासाठी,खासदार  आमदार दिव्यांग निधी दर वर्षी पंधरा लाख रुपये त्यांच्या मतदार संघात दिला तर त्यांना रस्तावर भिक मांगन्याची वेळ येणार नाही, ३) दिव्यांग, वृध्द निराधार याना अनेक योजनेचे तहसील मार्फत मिळणारे अनुदानात दोन्ही वेळा चहा साठी दुध मिळत नाही तर ते एक हजार मानधनात महिनाभर कसे जिवन जगत असतील त्यांचा विचार करुन किमान जीवन जगण्यासाठी  मानधनात दर महा पाच हजार रुपये वाढ करून ते वेळेवर दरमहा देण्यात यावे.

 4) अंत्योदय राशन योजनेत दिव्यांग व्यक्तीला स्वतंत्रअंत्योदय  राशन व राशन कार्ड देण्याची शासन तरतूद करावी, ५) दिव्यांगाना स्थानिक स्वराज्य कमिटीत सदस्य म्हणून निवड करण्यात यावे, ४) दिव्यांग बांधवाना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका, महानगर पालिका पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये दिव्यांगाचा पाच टक्के निधी दरवर्षी का देण्यात येत नाही न देणार्‍या अधिकारी यांच्या वर कडक कारवाई करावी, 5) म. ग्रा.रो.ह.योजनेत दिव्यांगाला काम मिळेना, 6) दिव्यांगाला स्वयंरोज गारासाठी जागा- गावातील शासकिय व निमशासकीय कार्यालयात व कार्यालयीन परिसरात दिव्यांगाला स्वयं रोजगारासाठी 200 स्केअर फुट जागा देण्याबाबत शासन निर्णय व परिपत्रक काढण्यात आले आहे. 

7) दिव्यांग बाधवाना घरकुल योजनेत प्राधान देण्यात यावे ८) प्रत्येक जिल्ह्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देऊन शासन प्रशासन यांची फसवणूक करणाऱ्या अधिकारी व संबधितावर कार्यवाही करावी खऱ्या दिव्यांगाना न्याय. मिळत नाही न्याय हक्क घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग बांधव पूणे आयुक्त कार्यालय येथे आंदोलनात सहभागी संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल, ज्ञानेश्वर नवले, नागोराव बंडे पाटिल, राजुभाऊ  शेरकुरवर, मगदुम शेख,दतात्रथ सोनकांबळे,बाबु पवार,चांदरात चव्हाण,निरगुडे एकनाथ,मारोती तमवाड,पवळे, मानसिग वडजे, गजानन रंजीत पाटिल,मगदुम शेख,प्रमसिंग चंव्हाण, विठ्ठलराव बेलकर, बालाजी होनपारखे, चांदू गवाले, चंद्रकांत जाधव,राहुल सोनूले,दिंगाबर लोणे,हानिफ शेख,संजय राठोड, ,सविता नांवदे, बालाजी भेंडेकर,बालाजी गवाले,हेंमत पाटिल, हरिश्र्चंद्र पोले, गोपाळ अडबलवार,अनिल रामशेटवार,ईत्यादी कारत्यानी केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी