नांदेड| जिल्हा रुग्णालयात आज जागतिक उच्च रक्तदाब दिवस संपन्न झाला. या कार्यक्रमास रुग्ण व त्यांचे नातेवाईक तसेच रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आहारातील मिठाचे प्रमाण जास्त असणे. दररोज व्यायामाचा अभाव. धुम्रपान व तंबाखूचे सेवन करणे. व्यक्तीचे वजन नियंत्रणात न रहाणे. मानसिक ताणतणाव वाढणे इ. घटकामुळे उच्च रक्तदाब आजार होतो. त्यामुळे लोणचे, जेवनात वरुन मीठ घेणे टाळावे. दररोज व्यायाम करावा. मानसिक ताण–तणाव दूर ठेवण्यासाठी योग, ध्यानधारणा करावी. उच्च रक्तदाब कसा, केंव्हा आणि का होतो याबाबतचे मार्गदर्शन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर यांनी केले.
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील यांनी प्रास्ताविक केले. उच्चरक्तदाब नियंत्रणाचे फायदे व मानसिक ताणतणाव कसा कमी ठेवावा. जेणेकरून उच्च रक्तदाब नियंत्रणात राहील. व्यक्तीच्या निरोगी आरोग्याबद्दल सांगतांना व्यक्तीने संतुलित आहार, पुरेशी झोप घ्यावी. त्याचबरोबर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थापासून (व्यसनापासून) दूर राहावे, असे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संतोष शिरसीकर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले.
यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.स) डॉ. ये. पी. वाघमारे, एनसीडी वैद्यकीय अधिकारी डॉ. विखारुनिसा खान, डॉ. ताजमुल पटेल, भूलतज्ञ डॉ. अनुरकर, डॉ. कागणे, डॉ. सुमय्या खान, डॉ. ढगे, डॉ. कांतीलाल इंगळे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, कार्यक्रम व्यवस्थापक (एन सी डी ) डॉ. उमेश मुडे, मानशास्त्रज्ञ डॉ. कैलास चव्हाण, प्रकाश आहेर, समुपदेशक सुवर्णकार सदाशिव, अधिपरिचारिका शिल्पा सोनाळे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी गायकवाड यांनी केले, तर आभार श्रीमती अनिता नारवाड यांनी मानले.