नांदेड| शतकीय परंपरा असलेल्या पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा‘अंबादास माडगुळकर स्मृति’ वार्षिक पुरस्कार डॉ नंदू मुलमुले यांच्या ‘मिर्झा गालिब: महाकवी दुःखाचा’ या ग्रंथाला जाहीर झाला आहे.
जागतिक वाड़मयात ज्याच्या दार्शनिक शायरीचे स्थान अढळ आहे अशा मिर्झा गालिब याच्या रचनांचा अस्तित्ववादी शून्यवादाशी असलेला संबंध, तसेच त्याच्या व्यक्तिगत आयुष्यातील चढ-उतारांची त्याच्या शायरीवर पडलेली छाया यांचा मनोविश्लेषणात्मक वेध डॉ मुलमुले यांनी या ग्रंथात घेतला असून, प्रख्यात हिंदी कवी, लेखक अशोक बाजपेयी यांच्या हस्ते २६ मे रोजी पुणे येथील एस एम जोशी सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. मुंबई येथील मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या या ग्रंथासाठी यापूर्वी बडोदे साहित्य परिषदेचा पुरस्कारही डॉ मुलमुले यांना लाभला आहे.