लोहा| विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या काळात टिकण्यासाठी अभ्यास केला पाहिजे सातत्य व कठोर मेहनत करावी जेणेकरून यश मिळेल असे मार्गदर्शन तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी केले.
लोह्यातील शिवकल्याण नगरातील जिज्ञासा अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन घेण्यात आले. यावेळी युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर , माजी नगराध्यक्ष किरण सावकार वटटमवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, नायब तहसीलदार अशोक मोकले, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब कऱ्हाळे, माजी सभापती आनंदराव पाटील, माजी सभापती शंकर पाटील ढगे, प्रा डॉ डी एम पवार, प्रा डॉ शैलेंद्र महाबळे, नगरसेवक दता वाले, भास्कर पवार, हरिभाऊ चव्हाण, शिवसेना संघटक मिलिंद पवार, दिनेश सावकार तेललवार बी डी जाधव, संचालक काशिनाथ सिरसिकार, संचालक हरिहर धुतमल, इमाम लदाफ, बद्रीनाथ राजूरे बालाजी धनसडे , यासह मान्यवर उपस्थित होते
तहसीलदार मुंडे यांनी अभ्यासिकेसाठी पुस्तके तसेच फॅन दिला त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माजी नगराध्यक्ष किरण सावकार यांनी ही अभ्यासिका आम्हा सर्व मित्राची आहे असेच आम्ही मानतो.असे सांगून विद्यार्थ्यांना पुस्तके कमी पडू देणार नाही असे सांगितले तर डॉ प्रा डी एम पवार यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडले. उपजिल्हाप्रमुख बाळू पाटील कऱ्हाळे यांनी विद्यार्थी ग्रामीण भागातील असून येथे अभ्यास करतात त्यांना आवश्यक ते समाज शास्त्राचे अभ्यासक प्रा डॉ शैलेंद्र महाबळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिकवा असा संदेश दिला. तसेच त्यांचे सामाजिक शैक्षणिक विषयक विचार त्यांनी प्रभावीपणे मांडले प्रास्ताविक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक काशीनाथ सिरसिकार यांनी तर आभार हरिहर धुतमल यांनी केले.