लोहा| शरद पवार हायस्कूल चितळी ता लोहा येथील इंग्रजी विषयाचे शिक्षक शिवाजी किसनराव काळे धावरीकर हे वयाच्या ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त झाले आहेत.
धावरी येथील भूमिपुत्र शिवाजी काळे हे १९९५ हे माध्यमिक शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांची २७ वर्ष सेवा झाली शिस्तप्रिय व विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची सेवा झाली आहे. संस्थापक कै.बाजीराव पाटील लुंगारे यांनी त्यांना सेवेचे दिली. मुख्याध्यापक बी बी खांडेकर यांनी वेळीवेळी मार्गदर्शन केले.
या सेवा काळात त्यांना काळे गुरुजींच्या सौभाग्य वती सौ लक्ष्मीबाई काळे यांची खंबीर साथ दिली. संस्थेच्या अध्यक्षा-श्रीमती सविताबाई लुंगारे.सचिव मधुकर पाटील लुंगारे, मुख्याध्यापक खांडेकर शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी यांनी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत