राष्ट्रीय महामार्ग ठेकदाराच्या नाकर्तेपणामुळे हिमायतनगरात अपघाताचे प्रमाण वाढले -NNL

ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी 


हिमायतनगर,अनिल मादसवार|
नांदेड - भोकर - हिमायतनगर - किनवट माहूर या राष्ट्रीय महामार्ग क्रं १६१ ए चे काम करणाऱ्या ठेकेदाराने हिमायतनगर शहरातील उमर चौक ते रेल्वेस्थानक रस्त्याचं व पूलाचे काम अर्धवट ठेवल्यामुळे दिवसागणीक अपघाताला निमंत्रण मिळत आहे. तरी देखील या रस्त्याच्या कामाला गती मिळाली नाही. त्यामुळे शहरातील हिमायतनगर येथील एका पत्रकाराचा अपघात झाला असून, खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह ते खड्ड्यात जाऊन पडल्याने गंभीर जखमी झाले. तातडीने ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नांदेडच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. 

हिमायतनगर शहरातून जात असलेल्या धानोडा - भोकर राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या ४ वर्षापासून संत गतीने सुरु आहे. या रस्त्याच्या कामाला म्हणावी तशी गती मिळत नसल्याने पावसाळ्यात चिखलाचा आणी उन्हाळ्यात धुळीचा सामना करण्याची वेळ शहरातील नागरिक व वाहनधारांवर आली आहे. शहारांतून होत असलेल्या रस्त्यावर तीन पूल आहेत, एका पुलाचे काम ठेकेदाराने जवळपास पूर्ण केले असून, दुसऱ्या पूल शहरातील मुख्य कमानीजवळ आहे. या पुलाचे काम सुरु करण्यासाठी ठेकेदाराने खोदकाम सुरु करून पुन्हा थांबविले. पुलाचे काम करण्यासाठी दोन्ही बाजूने खड्डे खोदून ठेवले मात्र कामास गती मिळाली नसल्याने जैसेथेच आहे. त्यामुळे येथील ये-जा करणारी दोन मोठी वाहने आल्याने जाणे कठीण आहे, रात्रीला तर अक्षरशा मृत्यूच्या दाढेतून प्रवास करण्याजोगे झाले आहे.


या पुलाचे काम ठप्प असल्याने येथे ठेकेदारने अपघात होऊ नयेत म्हणून कोणतेही सूचना फलक लावले नाही. रात्रीला वाहनधारकांना सुरक्षा मिळावी म्हणून रेडियम दिशादर्शक फलक लावले नसल्याने अंधारात ये-जा करताना अनेक वाहने येथील खड्डेमय रस्त्याने अडखळून पडत आहेत. असाच प्रकार हिमायतनगर येथील दैनिक लोकमतचे पत्रकार दिलीप शिंदे यांच्यासोबत घडला आहे. उमरचौक येथून आपल्या घराकडे सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जात असताना पुलाच्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने दिलीप शिंदे हे दुचाकीसह थेट १० फूट खोल खड्ड्यात पडले. यात ते गंभीर जखमी झाले असून, तातडीनं त्यांना हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेतून नांदेडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघात स्थळी पुलाचे बांधकाम करण्यासाठी एक वर्षांपासून ठेकेदाराने दोन्ही बाजूने नालीच्या ठिकाणी खड्डा करून ठेवला. परंत्तू काम सुरु केले नाही, तसेच प्रवाशी नागरिक वाहनधारकांना सुरक्षेच्या दृष्टिने येथे कोठेही सूचना फलक, रेडियम दर्शक फलक लावले नाही. येथे कोणतीही विद्दुत सोय नसल्याने रात्रीला अंधार असल्याने साहजिकच अपघात होते आहेत. ठेकेदाराने पुलासाठी खोदून ठेवलेले खड्ड्या ऐवजी पूल तयार केला असता किंवा येथे सूचना फलक लावले असते तर हा अपघात घडला नसता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

रस्त्याचे आणि पुलाचे काम करताना ठेकेदाराने काही राजकीय लोकांना हाताशी धरून त्यांची मर्जी सांभाळत संत गतीने थातुर - माहूर पद्धतीने काम करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे ४ वर्षांपासून या  रस्ता आणि पुलाचे काम अर्धवट ठेवण्यात आल्याचे हिमायतनगर शहरातील विकास कामाची वाट लागली आहे. खरेतर या रस्त्याच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत शहरातील विकासप्रेमी जनतेतून केली जात आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी