शिवसेनेच्या अवैध रेती विरोधी आवाहनानंतर अवैध रेती वाहतूक अधिक जोमाने -NNL


नांदेड़, गोविंद मुुंडकर।
शिवसेनेने तालुक्यात अवैध रेती चालू देणार नाही अशी भूमिका घेतली. या भूमिकेला खोडून काढण्यासाठी काँग्रेसने जाणीवपूर्वक मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक करण्याविषयी प्रोत्साहन देत असल्याचे सांगण्यात येते आहे.

बिलोली तालुक्यात काँग्रेसचा प्रभाव लक्षात घेता प्रशासन काँग्रेसच्या बाजूने आपला झुकते माप देत असते. बिलोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक सुरू आहे कारला फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात वादही झालेले आहेत. सगरोळी येथे दोन आणि बोळेगाव येथे दोन आणि माचनुर येथील अवैधरीत्या रीतीची वाहतूक होत आहे. हे सप्रमाण प्रशासनाला दाखवून देण्यात आले. पालक मंत्री हे काँग्रेसचे आहेत त्यांच्या नावाचा दुरुपयोग करून काही व्यक्ती प्रशासनावर दडपण आणत आहेत. प्रशासन ' जिसकी बहस उसकी लाटी'  प्रमाणे आपले काम करत असल्याचे दिसून येते. 

बिलोली तालुक्यात अवैध रेती वाहतूक चालू देणार नाही असा निर्धार शिवसेने ने केला. त्याच्या उलट जोरदारपणे अवैध रेती वाहतूक सुरू झाली. राज्यात काँग्रेस आणि शिवसेनेची युती असली तरी ते - ते परस्पर जुळवून घेत असले तरी तालुक्यात मात्र काँग्रेस शिवसेनेला दूर ठेवण्यात पसंत करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्हा परिषद निवडणूका जवळ आल्या आहेत शिवाय नगरपालिका तर काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत असे असताना रेती प्रकरणी काँग्रेसची भूमिका संशयास्पद असल्याचे शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याने खासगीत व्यक्त केले. 

भारतीय जनता पार्टीचे सुभाष साबणे पूर्वी शिवसेनेमध्ये होते त्यांच्यावर रेती प्रकरणातच मोठे आरोप झाले हाच कित्ता काँग्रेस गिरवतो आहे असे चित्र दिसून येते. दरम्यान जे यात आर्थिक दृष्ट्या मिळून नाहीत त्यांनीच शिवसेनेचे समर्थन करतील अशी भूमिका शिवसेनेचे तालुकाप्रमुख विजय मुण्डकर यांनी घेतली आहे. तरीही काँग्रेसने शिवसेनेला अवैध रेती प्रकरणी पाठिंबा दिलेला नाही.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी