लोह्यात नवनाथ चव्हाण यांच्या नेतृत्वात इंधन दरवाढी विरोधात "थाली बजाओ" आंदोलन -NNL


लोहा|
केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या विरोधात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आदेश व वरुण  सरदेसाई यांच्या सुचने नुसार लोह्यात युवा सेनेचे विधानसभा संघटक युवा नेते नवनाथ बापू चव्हाण यांच्या नेतृत्वात थाली बाजाओ-खुशिया मनाओ" आंदोलन करण्यात आले.

लोहा कंधार विधानसभेच्या युवा सेना संघटक पदाची जबाबदारी माजी आ रोहिदास चव्हाण यांचे चिरंजीव  नवनाथ बापू चव्हाण यांच्या वर पक्षाने सोपवल्या नंतर  त्यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले .पहिल्याच आंदोलनात त्यांनी संघटनात्मक  युवकांची फळी उभारण्यास सुरुवात केल्याचे दिसले 

शहरात नांदेड रोड स्थित पेट्रोल पंपावर युवा सैनिकांच्या उपस्थित इंधन दरवाढी विरोधात टाळ्या व थाळ्या वाजवून आंदोलन करण्यात आले. इंधनाचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्य माणूस हतबल झाला. पेट्रोल, डिझेल, गैसचे दर वाढीने कळस गाठलेला आहे. त्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ रविवारी युवासेना विधानसभा संघटक नवनाथ (बापू) रोहिदास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली थाळी व ताली आंदोलन करण्यात आले.

"थाली बजाओ- खुशिया मनाओ" द्वारे महागाईबद्दल केंद्र सरकारचे  प्रतिकात्म अभिनंदन करणारे निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी ऑटो यूनियनचे अध्यक्ष मनोज निखाते ,सतीश सूर्यवंशी,बालाजी गाडेकर, सुनील जामगे ,श्याम चांदणे, प्रताप वाकडे, कल्याण जामगे, महेश चव्हाण, शैलेश चव्हाण, अशोक केंद्रे, कैलास कहाळेकर पांडुरंग पवार, सतीश वाघमारे ,दीपक सूर्यवंशी,शिव काकडे, ऋषि श्रीमंगले, दीपक चव्हाण ,हनुमंत लुंगारे, बाळा चव्हाण, सोनू पवार, बाळू खडकमांजरीकर, प्रमोद गवते, छत्रपती जामगे, गोपाळ कदम सह सर्व युवासैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी