याबाबतचे सविस्तर वृत असे की, शहरातील गांधी नगर भागात प्रसिध्द अशी लिट्ल फ्लाँवर इंग्लीश स्कुल संस्था आहे. बिलोली शहरातील एकमेव इंग्रजी माध्यमाची शाळा असल्याने तालुक्यातील बहुसंख्य पालकांनी आपल्या पाल्यांचा सदर शाळेत प्रवेश घेतला आहे. पटेल खलील नामक पालक यांचेअमरीश,उमर,हुजेफा,शिफान,अशमेर ही अपत्येही याच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतात.तक्रादार खलील पटेल हे गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या मुलांची शैक्षणिक फिस नियमितपणे भरतात. विशेष म्हणजे ते पक्की पावती न घेताच.
केवळ खलील पटेल असे करतात असे नव्हे सर्वांनीच अशा चुकीच्या प्रकाराला मूक संमती दर्शवली होती. यामुळे सदर संस्थाचालक बोगस पावत्याच्या आधारे तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा केली आहे. आयकर विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.गत दोन वर्षाच्या कालावधीत कोरोनामुळे सर्वञ शाळा बंद असताना केवळ दोनच महिने शाळा सुरू होत्या.दोनच महिने शाळा असताना शाळा व्यवस्थापनाने तक्रारदारांच्या पाचही मुलांची पुर्ण फिस वसुल केल्याचा आरोप केला आहे.
यंदा सन २०२१-२०२२ चे शैक्षणिक वर्ष डिसेंबर महिन्यात सुरू झाले.यंदाच्या वर्षाचे खलिल पटेल यांनी २० हजार रूपये भरले.माञ ही फिस भरल्यानंतर शाळेकडून ओरिजनल पावती न देता बोगस पावती देण्यात आल्याची बाब त्यांच्या लक्षात आली.याउपर शाळेच्या मुख्याध्यापीका के.रजणीराणी ह्या खलिल पटेल यांच्या मुलांना दमदाटी करत आसल्याचे तक्रारीत नमुद केले आहे.याबाबत स्वत पटेल हे शाळेत जाऊन उर्वरीत फिस भरतो पण मला ओरिजनल पावती देण्याची मागणी केली असता मुख्याध्यापिकेने ओरिजन पावती देण्यास नकार देत उलट तुमच्या मुलांना शाळेत पाठवू नका असा दम दिल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.
अनेक वर्षापासून बोगस पावसाचा प्रकार सुरू असताना शिक्षण विभाग मात्र लक्ष दिले नाही यामध्ये त्यांचा मोठा वाटा असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान एकाही पालकाने तक्रार केली नाही ही बाबही चर्चिला जात आहे. सध्या केवळ शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या वतीने चौकशीची औपचारिकता पूर्ण केली जात आहे.याकडे जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी आता जोर धरत आहे.