नांदेड| गेली अनेक वर्ष शेकाप जिल्ह्यात जिवंत ठेवनारे शेकापचे जिल्हाध्यक्ष शुभाशिष कामेवार यांनी भाजप प्रदेश संघटनमंत्री तथा नांदेड लोकसभा प्रभारी श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते भाजप मध्ये प्रवेश केला आहे.
राज्यासह जिल्यातील निष्क्रीय आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून विकासाच ध्येय असलेल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणी राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस तसेच नांदेड चे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजप मध्ये प्रवेश करत असल्याचे कामेवार यांनी वक्तव्य केले.
जनतेच्या प्रश्नावर नेहमीच आवाज उठवुन वेग वेगळे आंदोलन करानारे सुभाशिष कामेवार यांच्या भाजप प्रवेशामुळे भोकर मतदार संघा सह नांदेड जिल्ह्यात पक्षाला बळ मिळेल.यात शंका नाही. या वेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, प्रदेश कार्यकारनी निमंत्रित सदस्य रामदास पाटील सुमठाणकर,प्रविन साले,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अँड किशोर देशमुख, अर्धापूर तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी, माजी सभापती डाॅ. लक्ष्मण ईंगोले यांची उपस्थित होती.
या वेळी शेकाप चे अमोल भवानकर, पिंटु तारू,दसरथ स्वामी, दयानंद विभुते,योगेश देशमुख, देवानंद वाघमारे ,बबलु तिम्मेवार, शिवप्रसाद सोनटक्के, बालाजी भुरे,तेजंदर सिंघ ढाकनीवाले,अजय भोसले, स्वप्निल खंदारे, मनोज शेळके,अतीष कांबळे, राजु वालमारे, ईश्वर चौगुलवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.